मागील 4 वर्षांत 11,386 जणांचा खड्ड्यांमुळे मृत्यू, देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमाकावर !

मागील 4 वर्षांत 11,386 जणांचा खड्ड्यांमुळे मृत्यू, देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमाकावर !

, प्रत्येक वर्षी सरासरी 10 हजार अपघात होत आहे. यात जवळपास 2800 लोकांचा मृत्यू झालाय. 2013मध्ये 9699, 2014 मध्ये 11106 आणि 2015 मध्ये 10876 लोकांचा मृत्यू झालाय.

  • Share this:

01 जानेवारी : मागील चार वर्षांत देशभरात 11 हजाराहुन अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहितीसमोर आलीये. दररोज होणाऱ्या रस्ते अपघातात 2800 लोकांचा मृत्यू होतो अशी सरकारच्या अहवालातून समोर आलीये. देशात खड्ड्यांमुळे सर्वाधिक मृत्यू उत्तरप्रदेशमध्ये झाले आहे तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतोय.

जगातील कोणत्याही सरकारवर सर्वात मोठी जबाबदारी असते ती आपल्या नागरिकांच्या जीवाची..एखाद्या दुर्घटनेत किंवा दहशतवादी हल्ल्यात लोकांचा मृत्यू होणे हे कारण पटू शकतं.. पण देशात खड्डे इतके खराब झाले आहे त्यामुळे मागील चार वर्षात 11 हजार लोकांचा मृत्यू झालाय. यामध्ये उत्तरप्रदेशमध्ये सर्वाधिक मृत्यू खड्डयांमुळे झाले आहे. तर महाराष्ट्र दुसरा क्रमांकांवर आणि तिसऱ्या क्रमांकावर मध्यप्रदेश आहे.

हिवाळी अधिवेशात राज्यसभेचे सदस्य प्राध्यापक रिचर्ड हे, प्रभूभाई नागरभाई वसावा आणि जाॅर्ज बेकर यांनी खड्ड्यांमुळे मृत्यूबाबत प्रश्न उपस्थितीत केला होता. सरकारने दिलेल्या उत्तरात 2016 मध्ये 2324 लोकांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला अशी माहिती दिली.  रस्ते परिवहन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2013 ते 2016 दरम्यान 11,386 लोकांचा खड्ड्यांमुळे मृत्यू झालाय.

खड्ड्यांमुळे दर वर्षी 10 अपघात

रस्ते परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी सरासरी 10 हजार अपघात होत आहे. यात जवळपास 2800 लोकांचा मृत्यू झालाय. 2013मध्ये 9699, 2014 मध्ये 11106 आणि 2015 मध्ये 10876 लोकांचा मृत्यू झालाय.  

योगी सरकारचा दावा फोल

योगी आदित्यनाथ सरकारने 15 जून 2017 पर्यंत रस्ते खड्डेमुक्त करणार अशी घोषणा केली होती. पण अजूनही घोषणा अंमलात आलेली नाही. आॅक्टोबर महिन्यात देवरियातील गौरीबाजार -हाटा मार्गावर खड्ड्यांमुळे रमावती देवी नावाच्या महिलेचा मृत्यू झाला. अशा घटना अजूनही सुरूच आहे.

मुंबईतही खड्ड्यांचे बळी

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत जुलै महिन्यात 2017 मध्ये जागृती होगळे या महिला बाईक रायडरचा डहाणू जव्हार रोडवर वेती येथे खड्यात बाईक आदळून ट्रकखाली आल्यामुळे मृत्यू झाला होता. तर सप्टेंबर महिन्यात मुंबईतील विलेपार्ले पोलीस दलात काम करणारे संतोष शिंदे यांचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य खड्डे मुक्त करणार अशी घोषणा केली खरी पण ती फक्त 99 टक्के पूर्ण झालीये. पण सत्य परिस्थिती जैसे थेच आहे.

अशी मिळवू शकतात नुकसान भरपाई

रस्ते सुरक्षेसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांनी सरकारच्या कारभाराला जबाबदार धरलंय.  भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणामुळे खड्ड्यांमुळे लोकांचे नाहक बळी गेले आहे. रस्ते सुरक्षेसाठी काम करणाऱ्या ट्रॅक्सचे अध्यक्ष अनुराग कुलश्रेष्ठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, खड्ड्यांमुळे एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याला संबंधीत संस्थेकडून नुकसान भरपाई घेता येते. पण, ज्या खासगी संस्थांकडे रस्ते देखभाल करण्याची जबाबदारी असते अशा संस्था अपघातानंतर हात वर करतात.  जर तुमच्याकडे खड्ड्यांमुळेच मृत्यू झाला याचा पुरावा आणि पोलिसांनी हे सिद्ध केला असेल तर अशा संस्थांना नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2018 07:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading