ना हुंडा,ना गाड्या भेट ; 'या' गावात लग्नानंतर मुली सासरी पाठवत नाही !

ना हुंडा,ना गाड्या भेट ; 'या' गावात लग्नानंतर मुली सासरी पाठवत नाही !

गावात लग्नाचा खर्च मुलाकडची मंडळी उचलतात. एका लग्नाचा खर्च किमान 70-80 हजार इतका असतो.

  • Share this:

30 आॅक्टोबर : या गावात लग्न होतं पण मुलींची सासरी पाठवणी होत नाही...होय, ही प्रथा आहे रामपूर (उत्तर प्रदेश) च्या दोंकपुरी या गावातली. या गावात लग्नं तर खूप होतात पण इथं मुलींची पाठवणी होत नाही. अहो, इतकंच काय तर इथं विवाह सोहळ्याचा गोंधळ नाही, ना हुंडा पद्धत. मग तो कोणता ही पक्ष असो वर पक्ष किंवा वधू पक्ष खर्च हा नाहीच.

या संपूर्ण गावात एकमेकांचे नातेवाईक आहेत. आजी, आजोबा, मामा, आत्या, काका, इत्यादी. हे सगळे एकाच गावात राहतात. इथले लोक त्यांच्या मुलं-मुलींची लग्न गावातच लावतात. गावाबाहेर लग्न करण्याची त्यांच्या इंथली पद्धत नाही.

अजीमनगर भागातील या गावाची गोष्ट जर वेगळीच आहे.  या गावात 9 हजार इतका मुस्लिम बंजारा समाज राहतो. या गावाचे प्रधान मोहम्मद फारुख यांनी न्यूज 18 शी बातचीत केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की, गावात लग्नाचा खर्च मुलाकडची मंडळी उचलतात. एका लग्नाचा खर्च किमान 70-80 हजार इतका असतो. हुंडा देण्याची प्रथा यांच्या लग्नात नाही. इथं दुचाकी आणि चारचाकी गाड्याही हुंडा म्हणून देण्याची प्रथा नाही.

गावात 'फलाई मुस्लिम बंजारन तनजी' ही एक समिती तयार करण्यात आली आहे. विवाहसोहळ्यात फटाके आणि डीजे वाजवणाऱ्यांना रोखण्याचं काम ही समिती करते. त्याच बरोबर ही समिती गरीब कुटुंबातील मुलींच्या विवाह सोहळाही पार पाडण्यास मदत करते.

या गावासाठी काही नियम बनवले गेले आहेत. एकाच दिवशी अनेक विवाह केले जातात. ज्याने खाण्या-पिण्याचा खर्च वाचतो. मार्च, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यांत या गावात विवाह सोहळे होतात.

या गावाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती चांगली आहे. हे गाव बिर्यानी बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. बिर्यानी बनवणारे कारागिर खूप प्रसिद्ध आहे. संपूर्ण जिल्ह्यात या गावाची वेगळीच ओळख आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2017 11:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading