राज्यसभा निवडणूक : सहापैकी 3 जागा भाजपकडे, सेनेकडून कोण ?

राज्यसभा निवडणूक : सहापैकी 3 जागा भाजपकडे, सेनेकडून कोण ?

संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

23 फेब्रुवारी : यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभा सदस्यांच्या जागा भरण्यासाठी राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचे बिगुल आज वाजले. यात महाराष्ट्र मधील 6 जागांचा समावेश आहे. सेनेकडून फक्त एकच जागी अनिल देसाई आहे.

निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 58 जागांसाठी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 12 मार्च आहे. तर या जागांसाठी 23 मार्च रोजी मतदान होणार आहे.

राज्यसभेतील कार्यकाळ संपत असलेल्या प्रमुख सदस्यांमध्ये अरुण जेटली, थावरचंद गेहलोत, प्रकाश जावडेकर, जगतप्रकाश नड्डा, धर्मेंद्र प्रधान, रविशंकर प्रसाद या सहा मंत्र्यांचा समावेश आहे. तसेच सचिन तेंडुलकर, जया बच्चन, रेखा, चिरंजीवी, हे नामवंतही एप्रिलमध्ये निवृत्त होत आहेत. कार्यकाळ संपत असलेल्या महाराष्ट्रातील सदस्यांमध्ये वंदना चव्हाण, डी. पी. त्रिपाठी (राष्ट्रवादी), रजनी पाटील, राजीव शुक्ला (काँग्रेस), अजय संचेती (भाजपा), अनिल देसाई (शिवसेना) यांचाही त्यात समावेश आहे.

महाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार

वंदना हेमंत चव्हाण  - राष्ट्रवादी

डी. पी. त्रिपाठी  - राष्ट्रवादी

रजनी पाटील  - काँग्रेस

अनिल देसाई  - शिवसेना

राजीव शुक्ला - काँग्रेस

अजयकुमार संचेती - भाजप

केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्‍ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.

कोणत्या पक्षाचे किती खासदार?

भाजप -17

काँग्रेस - 12

समाजवादी पक्ष - 6

जदयू - 3

तृणमूल काँग्रेस - 3

तेलुगू देसम पक्ष - 2

राष्ट्रवादी कॉंग्रेस - 2

बीजद - 2

बसप - 1

शिवसेना - 1

माकप - 1

अपक्ष  - 1

राष्ट्रपती नियुक्‍त - 3

संख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

कोणत्या राज्यातील किती जागा?

आंध्र प्रदेश - 3

बिहार - 6

छत्तीसगड - 1

गुजरात - 4

हरियाणा - 1

हिमाचल प्रदेश - 1

कर्नाटक - 4

मध्य प्रदेश - 5

महाराष्ट्र - 6

तेलंगणा - 3

उत्तर प्रदेश - 10

उत्तराखंड - 1

पश्चिम बंगाल - 5

ओदिशा - 3

राजस्थान - 3

झारखंड - 2

याशिवाय केरळातील खासदार वीरेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत सर्वाधिक संख्याबळ आहे.

First published: February 23, 2018, 11:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading