शिका काही जपानकडून !, फक्त 20 सेकंद ट्रेन लवकर निघाली म्हणून मागितली माफी

शिका काही जपानकडून !, फक्त 20 सेकंद ट्रेन लवकर निघाली म्हणून मागितली माफी

या ट्रेनचा ठरलेला वेळ हा 9 वाजून 44 मिनिटं आणि 40 सेकंद होता मात्र ही ट्रेन त्याआधी 20 सेकंद म्हणजे 9 वाजून 44 मिनिटं आणि 20 सेकंदांनी निघाली

  • Share this:

17 नोव्हेंबर : उगवत्या सुर्याचा देश अशी ज्याची ओळख सांगितली जाते तो जपान अनेक गोष्टींसाठी जगभर वाखाणला जातो आणि यावेळेला या इवल्याशा देशाची स्तुती झालीय ती सॉरी म्हटल्याबद्दल..

जपानमधली एक ट्रेन 20 सेकंद लवकर निघाल्याबद्दल त्या कंपनीनं चक्क रेल्वे प्रवाशांची माफी मागितलीय. तोक्यो आणि त्सुकुबा दरम्यान चालणाऱ्या त्सुकुबा ट्रेन प्रशासनानं आम्ही प्रवाशांना झालेल्य त्रासाबद्दल दिलगीर आहोत अशी माफी मागितली आहे आणि कंपनीनं चक्क माफीनामच प्रसिद्ध केला आहे.

या ट्रेनचा ठरलेला वेळ हा 9 वाजून 44 मिनिटं आणि 40 सेकंद होता मात्र ही ट्रेन त्याआधी 20 सेकंद म्हणजे 9 वाजून 44 मिनिटं आणि 20 सेकंदांनी निघाली. या अवघ्या 20 सेकंदांबद्दलही कंपनीनं माफी मागितली आहे. आणि त्यातही वैशिष्टयपूर्ण गोष्ट म्हणजे एकाही प्रवाशाची ट्रेन चुकली नाही. कारण सर्वच प्रवासी वेळेपूर्वी प्लॅटफॉर्मवर हजर होते. वक्तशीरपणासाठी जपानी लोक जगभर नावाजले जातातच पण त्यांच्या या माफीनाम्यानं त्यांच्याविषयीच्या आदरात भरच पडली आहे.

तर दुसरीकडे भारतीय रेल्वेनं यातून बरच काही शिकण्यासारखं आहे. आपल्या उशीरापणाविषयी आपण जगभरात नावजले जातो. लांब पल्ल्यांच्या ट्रेनचे होणारे अपघात हे बातम्या आणि मदतीचा आकडा यानंतर दुसऱ्या दिवशी जणू विसरलेच जातात, मध्य रेल्वेची ओळखच रोजमरे अशी झालेली आहे, एकीकडे बुलेट ट्रेनच्या बाता आपण मारत असताना दुसरीकडे रोज ट्रेनमधून होणारे मृत्यू रोखणं आपल्याला शक्य होत नाही.

एलफिन्स्टन रेल्वेस्टेशनवरचा साधा ब्रिज बांधायलाही आपल्याला लष्कराची मदत लागते पण मुंबई पुणे प्रवासासाठी हायपर लूपचा एमओयू मात्र लगेच साईन होतो.  ट्रेन किमान वेळेवर चालवणं, अपघात कमी होतील यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आणि आपल्या चुका दुसऱ्यावर न ढकलता प्रामाणिकपणे चुका कबूल करण इतकं जरी भारतीय रेल्वे आणि आपणही जपान्यांच्या या माफीनाम्यातून शिकलो तर खूप नाही का ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 05:02 PM IST

ताज्या बातम्या