माझ्यावर झालेले आरोप खोटे,राधे माँची नौटंकी सुरूच

माझ्यावर झालेले आरोप खोटे,राधे माँची नौटंकी सुरूच

  • Share this:

24 आॅक्टोबर : मी अतिशय सामान्य व्यक्ती आहे, माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत असा दावा वादग्रस्त आणि स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ यांनी केलाय.

दोन वर्षांपूर्वी राधे माँ विरोधात कांदिवलीतील निक्की गुप्ता या महिलेने सासरच्या सहा जणांविरोधात हुंड्यासाठी छळाची तक्रार केली होती. राधे माँ हिच्या सांगण्यावरूनच सासरचे लोक आपला मानसिक छळ करत असल्याचा निक्की यांचा आरोप आहे. निक्की यांच्या तक्रारीवरून राधेमाँसह सातही जणांवर कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल आहे.

दोन वर्षांनंत राधे माँ मीडियासमोर आली. न्यूज १८ इंडियाचे प्रतिनिधी संदीप सोनवलकर यांनी राधे माँ यांची मुलाखत घेतली.  या मुलाखतीत तिने वेगवेगळे खुलासे केले. माझ्यावर जेव्हा आरोप झाले होते  तेव्हा मला खूप त्रास झाला, मी पूर्णपणे कोलमडून गेले होते, पण माझ्या भक्तांनी मला सावरलं, असंही त्या म्हणाल्या.

First published: October 24, 2017, 10:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading