Elec-widget

विराट कोहलीचा डुप्लिकेट तुम्ही पाहिलात का?

विराट कोहलीचा डुप्लिकेट तुम्ही पाहिलात का?

मंडळी हल्ली विराटचं दर्शन जुन्नर तालुक्यातल्या अनेक लोकांना वरचेवर होतंय. आश्चर्य वाटलं ना, होय हे अगदी खरंय. पण थोडं थांबा.

  • Share this:

रायचंद शिंदे, 31 डिसेंबर : असं म्हटलं जातं की जगात एकसारखे दिसणारे 7 चेहरे असतात. बऱ्याचदा तुम्हालाही असा अनुभव आला असेल. आम्हीही तुम्हाला जुन्नरच्या एका अशा सेम टु सेम दिसणाऱ्या व्यक्तिची भेट घालून देणार आहोत. तर तो सध्या खूप चर्चेत आहे. तो मैदानात उतरला की कोट्यवधी भारतीयांचा ठोका चुकतो. ज्याच्यावर देशभरातल्या तरुणीही फिदा आहेत. तुम्ही ओळखलंच असेल. आम्ही कुणाबद्दल बोलतोय. होय, भारतीय संघाचा हँडसम हंक आणि रनमशिन विराट कोहली. पण मंडळी हल्ली विराटचं दर्शन जुन्नर तालुक्यातल्या अनेक लोकांना वरचेवर होतंय. आश्चर्य वाटलं ना, होय हे अगदी खरंय. पण थोडं थांबा. कारण तो खरा विराट कोहली नाहीये तर तो आहे ज्युनिअर विराट सिद्धेश जाधव.

सिद्धेश जाधव

सिद्धेश जाधव

कल्याण- नगर महामार्गावर असलेल्या पिंपरी पेंढार गावात हा ज्युनिअर विराट सिद्धेश जाधव राहतो. सिद्धेशलाही लहानपासून क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. सोशल मीडियावर सिद्धेशचे फोटो झळकले आणि मग आम्हीही त्याचा शोध घेत त्याच्या घरी पोहचलो. आणि मग आमचीही खात्री पटली कि ओरिजनल विराट कोहली आणि सिद्धेश म्हणजे एकाला झाकावं आणि दुस-याला समोर आणावं. सिद्धेश विराटसारखा हुबेहुब दिसतो याचं सिद्धेशच्या आईलाही खूप कौतुक आहे.

8 डिसेंबर 2016 ला विराट कोहली आणि सिद्धेशची भेट झाली होती. त्यावेळी सिद्धशेला बघितल्यावर विराटही बघतच राहिला होता. मग काय विराटनं सिद्धशेला वानखेडेवरल्या सामन्यांची तिकीटं दिली. आणि मैदानावरही परदेशी क्रिकेटरर्सनी डुप्लिकेट विराट म्हणत सिद्धेशसोबत सेल्फी घेतले.

सिद्धेशला पहिल्यांदा कुणीही पाहिलं तरी समोरची व्यक्ती अचंबित होणार हे नक्की आहे. अशा प्रसंगांचा सिद्धेशला सध्या रोजचं अनुभव येतोय. सोशल मिडियावरही सिद्धेश जाम फेमस झालाय. पण या विराटफेममध्ये सिद्धेशचा एक तोटा म्हणजे हल्ली भारतानं मॅच हरली तर लोक सिद्धेशलाच जाब विचारायला लागलेत.

Loading...

असा हा जुन्नरचा ज्युनिअर विराट सिद्धेश लोकांनाही विराट पाहिल्याचा आनंद देतोय आणि आपणही जगातला दिग्गज क्रिकेटर असल्याचा अनुभव घेतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2017 01:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...