'ते' दोघे, चार महिने आणि १८ देशांचा 20 हजार किमीचा दुचाकीवरून प्रवास !

'ते' दोघे, चार महिने आणि १८ देशांचा 20 हजार किमीचा दुचाकीवरून प्रवास !

पुण्यातल्या एका जोडप्याने कित्येक दिवस मनाशी बाळगलेल स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर पडायचा निर्णय घेतला, नोकऱ्यांचे राजीनामे दिले आणि सुरू केली जगभ्रमंती ती ही दुचाकीवर..

  • Share this:

वैभव सोनवणे,पुणे

02 डिसेंबर : उद्या करू म्हणून आयुष्यभर काही स्वप्ने मागे राहतात... जगण्याच्या गरजा त्यासाठी उर फुटेपर्यंतची रोजची धावपळ आणि त्यातून आलेली सुखासीनता हळूहळू सोडवत नाही. पण पुण्यातल्या एका जोडप्याने कित्येक दिवस मनाशी बाळगलेल स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाहेर पडायचा निर्णय घेतला, नोकऱ्यांचे राजीनामे दिले आणि सुरू केली जगभ्रमंती ती ही दुचाकीवर..

धाडस माणसाला हवं ते करवतं. आता अनुराधा भोसले दिवार आणि मानस दिवारचंच बघा ना, मोठाल्या पगाराची कमाई सोडून त्यांनी जगभर भटकायचं ठरवलं आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा खजिना त्यांना गवसला. ही गोष्ट त्या आनंदाची आणि त्यासाठीच्या धाडसाची आहे. धाडस करणाऱ्या मराठमोळ्या महिलेची आहे.

या मुशफिरीत रमलेल्या कुटुंबाचा एक आणखी साथीदार आहे. त्यांची डुकाटी बाइक. युरोपातल्या १८ देशातली भटकंती हीच्या सोबत झालीय. चार महिन्यात सुमारे २० हजार किलोमिटरचा प्रवास झाला तो या बाइकच्या साथीनं. डुकाटी होती म्हणूनही अनुराधा आणि मानसला अनेकांचे मैत्री गवसले.

या जोडप्याचं जगभ्रमंतीचं वेड त्यांना शहाणं करून गेलं आहे. अनुभवाचा समृद्ध खजिना देऊन गेलं आहे आणि नवी उमेद सुद्धा. जाता जाता ते आपल्यालाही शिकवून जातात. धाडस करा किमान एकदा तरी आयुष्यात धाडस करा.

First published: December 2, 2017, 10:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading