शिवरायांनी रामदास स्वामींना गावं इनाम दिल्याचं पत्र सापडलं, संभाजी ब्रिगेडचा मात्र विरोध

शिवरायांनी रामदास स्वामींना गावं इनाम दिल्याचं पत्र सापडलं, संभाजी ब्रिगेडचा मात्र विरोध

मात्र आता शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींच्या चाफळ मठाच्या खर्चासाठी गावं इनाम दिल्याचं पत्र ब्रिटिश लायब्ररीत सापडलंय त्याच वाचन इतिहास संशोधन मंडळाच्या पाक्षिक सभेमध्ये करण्यात आलंय.

  • Share this:

वैभव सोनवणे, पुणे

27 डिसेंबर : शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थ यांच्यातील संबंध किंवा महाराजांची त्यांच्याबद्दल असलेली भूमिका यावरून अनेक राजकीय वाद आहेत. मात्र आता शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींच्या चाफळ मठाच्या खर्चासाठी गावं इनाम दिल्याचं पत्र ब्रिटिश लायब्ररीत सापडलंय त्याच वाचन इतिहास संशोधन मंडळाच्या पाक्षिक सभेमध्ये करण्यात आलंय. मात्र या पात्राला संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतलाय आणि या पत्राच्या सत्यतेलाच आव्हान दिलंय.

शिवाजी महाराजांनी स्वामी समर्थ अर्थात रामदास स्वामींना इनाम म्हणून गाव दिल्याचा उल्लेख असलेलं पत्र शोधल्याचा दावा काही इतिहास संशोधकांनी केलाय. भारत इतिहास संशोधन मंडळात त्याच वाचन ही करण्यात आलंय. कौस्तुभ कस्तुरे आणि शिवराम कार्लेकर यांनी या पात्राची मूळ प्रत ब्रिटीश लायब्ररीतून मिळवून भाषांतरित केलीये. या मूळ पत्राच्या प्रतीही या दोघांनी मिळवल्यात.

इतिहासातले शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थ यांचे संबंध याबाबत अनेक वादविवाद आहेत. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघासारख्या काही संघटनांचा रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांच्या संबंधांच्या ऐतिहासिक संदर्भाला विरोध आहे. नव्याने सादर करण्यात आलेल्या पात्राच्या पुराव्याला ही संभाजी ब्रिगेडने आव्हान दिलंय. या अस्सल प्रति नसून ही बनावट पत्र असल्याचा दावा त्यांनी केलाय.

समर्थांबाबतच हे पात्र समोर आल्यानंतर पुन्हा एका नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. इतिहास हा प्रेरणा घेण्यासाठी असावा की राजकीय वादासाठी असा प्रश्न पुन्हा उपस्थित होईल.

First published: December 27, 2017, 11:28 PM IST

ताज्या बातम्या