S M L

एका 'टॅटू'मुळे लागला गुन्ह्याचा छडा, प्रियकराला पडल्या बेड्या !

आधी तिला भोसकल आणि मग पेट्रोल टाकून तिचा मृतदेह पेटवून दिला. 80 टक्के जळालेल्या मृतदेहात केवळ तिचा हात आणि त्यावर गोंदवलेलं नाव एवढंच काय तो सुगावा पोलिसांकडे होता.

Sachin Salve | Updated On: May 14, 2018 06:48 PM IST

एका 'टॅटू'मुळे लागला गुन्ह्याचा छडा, प्रियकराला पडल्या बेड्या !

पुणे, 14 मे :  विमाननगर पोलीस स्टेशन च्या हद्दीत शनिवारी एका महिलेचा 80 टक्के जाळलेला मृतदेह मिळून आला होता 80 टक्के जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे जवळपास अशक्य होत मात्र अत्यंत शिताफीने पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली आणि समोर आलंय अत्यंत धक्कादायक वास्तव...

विमाननगर पोलीस ठाण्यात सकाळी 10.15 वाजता आलेल्या फोन कॉलने मोठी धावपळ उडाली...एका महिलेचा जळालेल्या अवस्थेतला मृतदेह निर्जनस्थळी आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर विमाननगर पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र 80 टक्के जळालेल्या या महिलेच्या ओळख पटवण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी येत होत्या पूर्ण शरीरावरची कातडी आणि आणि चेहरा जळालेला असल्याने ओळख पटवण्याच मोठं आव्हान होतं. मात्र पोलिसांनी अत्यंत चलाखीने हे काम केलंय,या महिलेचा केवळ एक हात जळलेला नव्हता आणि त्यावर नाव होत अयोध्या..

या एकाच नावावरून शोध घ्यायला सुरवात केली ,फेसबुक वर अयोध्या नावाने शोध घेतला आणि हातावर असलेलं अयोध्या नाव असलेलं अकाउंट शोधलं अखेर फोटोवरून खात्री झाल्यानंतर पोलिसांना मृत महिलेचं नाव समजलं ,अयोध्या वैद्य,वय 25 वर्ष...
अयोध्या हीच अनैतिक संबंध असलेल्या तिच्या प्रियकारानेच काटा काढला होता. आयोध्याने सतत लग्न करण्यासाठी तगादा लावला होता. आयोध्याचा मागणीला वैतागून अखेर बालाजी धाकतोंडे या तिच्या प्रियकराने मित्राच्या मदतीने आधी तिला भोसकल आणि मग पेट्रोल टाकून तिचा मृतदेह पेटवून दिला. 80 टक्के जळालेल्या मृतदेहात केवळ तिचा हात आणि त्यावर गोंदवलेलं नाव एवढंच काय तो सुगावा पोलिसांकडे होता.

गुन्हेगारांनी गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला तरी आरोपींच्या दुर्दैवाने या खुनाला वाचा फुटलीच. फेसबुकवर हातावर गोंदवलेलं नाव आणि कडं याची ओळख पटल्याने मोठ्या शिताफीने गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2018 06:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close