S M L

'त्या' अनधिकृत होर्डिंगने समृद्धी आणि 4 वर्षाच्या समर्थला केलं पोरकं !

Updated On: Oct 6, 2018 09:05 PM IST

'त्या' अनधिकृत होर्डिंगने समृद्धी आणि 4 वर्षाच्या समर्थला केलं पोरकं !

पुणे, 06 आॅक्टोबर : पुण्यात शुक्रवारी एक अनधिकृत होर्डिंग थेट रस्त्यावर कोसळलं. आणि सिग्नलवर गाडी घेऊन उभ्या असलेल्या 4 जणांचं आयुष्यच हिरावून घेतलं..

या दुर्घटनेत 4 कुटुंबांनी त्यांच्या घरातली जीवलग माणसं गमावली... त्यातलंच एक परदेशी कुंटूंब...हे कुटुंबच आज पोरकं झालंय.शिवाजी परदेशी.. पुण्यातले रिक्षाचालक...काही दिवसांपूर्वी हे जग सोडून गेलेल्या आपल्या पत्नीच्या अस्थी विसर्जित करुन शुक्रवारी ते आळंदीहून पुण्याला परत येत होते.

रिक्षा जुन्या बाजारातील शाहीर अमर शेख चौकात सिग्नलला थांबली. शिवाजी विचारात हरवले होते.

Loading...

तेवढ्यात काही सेकंदात भलं मोठं होर्डिंग त्याच रिक्षावर धाडकन आदळलं.

शिवाजी परदेशी यांनी जागीच जीव सोडला आणि आई पाठोपाठ बापही गेल्यानं दोन मुलं पोरकी झाली.

6 महिन्यापूर्वीच घेतलेल्या रिक्षाचा चक्काचूर झाला. आईपाठोपाठ बापही गेला. बारावीत शिकणारी समृद्धी आणि अवघ्या 4 वर्षाच्या समर्थची जबाबदारी त्यांच्या आजी आणि आत्यावर येऊन पडलीय.

==============================================

पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेचे भीषण PHOTOS

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 6, 2018 09:05 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close