VIDEO : पुणेरी शेतकऱ्याने वाटले 'सोनेरी' पेढे!

VIDEO : पुणेरी शेतकऱ्याने वाटले 'सोनेरी' पेढे!

पुण्याच्या धायरी भागातल्या सुरेश पोकळे यांना सोन्याची आणि गाड्या घेण्याची खूप हौस.

  • Share this:

पुणे, 06 सप्टेंबर : सोनं घालण्याची हौस फक्त स्त्रियांना असते असं नाही तर किलो-किलो सोनं घातलेले पुरूष आपण पाहिलेत. पण सोनं वाटणारं कुणी पाहिलंय का तुम्ही...पुण्याच्या एका शेतकऱ्याने होय, शेतकऱ्याने...चक्क सोन्याचा वर्ख असलेली मिठाई वाटली.निमित्त होते एककोटीची कार...

पुण्याच्या धायरी भागातल्या सुरेश पोकळे यांना सोन्याची आणि गाड्या घेण्याची खूप हौस. त्यांनी नुकतीच 1 कोटी 12 लाखाची जॅग्वार कार विकत घेतली. आता 1 कोटीची कार घेतली म्हटल्यावर शानही वाढली. म्हणूनच 1 कोटीची कार घेण्याचा जल्लोष ही तसाच साजरा केला. पोकळे कुटुंबाने सोन्याचा वर्ख असलेली मिठाई वाटून आनंद साजरा केला.

गाडी घेतली म्हणून पेढा वाटण्याची पद्धत जुनी आहे, पण सोन्याचा वर्ख असलेली मिठाई हा पुण्यात चर्चेचा विषय बनलाय. पोकळे यांनी काका हलवाईकडून 7000 रुपये किलोच्या दराने सोन्याचा वर्ख असलेली 3 किलो मिठाई तयार करून घेतली आणि ही सोनेरी मिठाई त्यांनी आप्तस्वकीय आणि मित्रमंडळींना वाटली.

पुण्यात सोनं वापरणारे हौशी तसे काही कमी नाही. गळ्यात 2 किलो सोने मिरवणारे स्वर्गीय मनसेचे आमदार रमेश वांजळे यांची ओळख संपूर्ण पुण्याला आहे. तर पिंपरी चिंचवडचे सोन्याचा शर्ट मिरवणारे दिवंगत दत्ता फुगे तुम्हाला आठवत असतील. दत्ता फुगे यांनी त्यावेळी रांका ज्वेलर्सकडून साडेतीन किलो वजनाचा दीड कोटी रुपये किंमतीचा सोन्याचा शर्ट तयार करून घेतला होता. एवढंच नाहीतर दत्ता फुगे यांच्या अंगावर साडे चार किलो सोन्याचे दागिनेही होते.

आता यात भर पडलीय पुण्याच्या धायरी भागातील शेतकरी संजय पोकळे यांची...त्यांनी शर्ट किंवा सोन्याच्या साखळ्या बनवल्या नाहीतर चक्क सोनेरी पेढा वाटून एकच धुराळ उडवून दिलाय.

मालिकेतून सुचना सोन्याचा पेढा

याबद्दल सुरेश पोकळे यांना विचारले असता ते म्हणाले की,

मी नवी गाडी घेतली. मी टिव्हीवर एक मालिका पाहिली होती. त्यात बहिणीने भावाला सोन्याचा पेढा भरवला होता. त्यामुळे मलाही तसेच पेढे तयार करण्याची कल्पना सुचली आणि काका हलवाईचे मालक अविनाश गाडवे यांना फोन केला. त्यांनी तसे पेढे तयार करता येईल असं विचारलं. मग तसे पेढे तयार केले. त्या सोन्याच्या पेढ्यावर सोन्याचा वर्ख आहे. मला पहिल्यापासून सोन्याची आवड होती असं पोकळे यांनी सांगितलं.

असा तयार झाला पेढा

तर काका हलवाईचे मालक अविनाश गाडवे म्हणतात की, सुरेश पोकळे हे माझे चांगले मित्र आहे. त्यांनी जग्वार गाडी घेणार हे सांगितलं होतं. मग आम्ही पुण्यात असा पेढा तयार केलाय जो कधीच कुणी बनवला नाही. त्यांच्या कल्पनेनुसार सोन्याचा पेढे तयार करण्याचं ठरवलं. त्याआधी मी त्यांना मलाई पेढा, केशरी पेढा, ड्रायफ्रुड पेढा दाखवला. पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर सोन्याचा वर्ख लावून पेढा तयार केला. या पेढ्यामध्ये केसराचं प्रमाण जास्त आहे. ड्रायफ्रुड, मलाई पेढ्याचं कोटिंग वापरून सोन्याचा वर्ख लावला. आता आम्ही सोन्याची बर्फी तयार करतोय, गणेशोत्सवासाठी खास ही बर्फी तयार करण्यात येणार आहे अशी माहितीही गाडवे यांनी दिली.

---------------------------------------

VIDEO : या धरणातलं पाणी इतकं हिरवं झालंच कसं ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2018 06:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading