एकेकाळी देत होते इंजिनिअरिंगचे धडे,आज सुरू केली चहाची 'टपरी'!

एकेकाळी देत होते इंजिनिअरिंगचे धडे,आज सुरू केली चहाची 'टपरी'!

सध्या नोकऱ्या जाण्याचं प्रमाण खूप वाढलंय आणि हताश झालेले तरूण मग टोकाचं पाऊल उचलतात.

  • Share this:

हलीमा कुरेशी,पुणे, 22 आॅगस्ट :  पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटच्या 500 शिक्षकांना संस्थेने नोकरीवरून काढून टाकल्यानंतर अनेकांना पर्यायी नोकरी आणि धंदा शोधावा लागतो. त्यापैकीच असलेल्या महेश तनपुरे यांनी ने नर्हे गावात चक्क चहाचा कॅफे सुरू केलाय.

एकेकाळी इंजिनिअरिंगचे धडे देणाऱ्या महेश तनपुरेंच्या हातात आता पातेलं आणि चहाची पूड आलीये. हे ऐकल्यावर महेश बद्दल तुम्हाला सहानुभूती वाटेल पण तसं वाटून घेऊ नका. त्यांच्या हाताचा फक्कड चहा प्यायलात तर तुम्ही घरचा चहा विसरून जाल. त्यांच्या चहात हाताची चव तर आहेच पण ते चहात स्वतः तयार केलेला मसालाही टाकतात. तनपुरेंचा 'फक्त चहा' हा कॅफे ने नऱ्हे गावात फक्कड चहा मिळण्याचं ठिकाण झालंय.

सिंहगड इन्स्टिट्यूटने 18 महिन्यांचा पगार थकवल्याने शिक्षकांनी आंदोलन केलं. काही शिक्षकांना संस्थेनं काढून टाकलं, त्यापैकीच एक, एम ई मॅकेनिकल थर्मल असलेले महेश तनपुरे. नोकरी गेली आणि घरची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर म्हणून मग त्यांनी चहाचा कॅफे सुरू केला. पण 'फक्त चहा' कॅफेतल्या चहाने अजिबात पित्त होत नाही असा ग्राहक अनुभव सांगतात.

मलाही महेश प्रमाणे सिंहगड इन्स्टिट्युटनं काढून टाकलं, पण महेशने खचून न जाता चहाचा कॅफे सुरू केला, याचं कौतूक असल्याचं त्यांचा मित्र अनिकेत पाटील म्हणाला.

सध्या नोकऱ्या जाण्याचं प्रमाण खूप वाढलंय आणि हताश झालेले तरूण मग टोकाचं पाऊल उचलतात. अशांना महेश तनपुरे या शिक्षकाने फक्त अभ्यासाचेच धडे नव्हे तर या कृतीतून आयुष्याचे धडे दिले आहेत.

VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2018 04:27 PM IST

ताज्या बातम्या