S M L

दोन मिनिटात अख्खं एटीएम उखडून गाडीत, हायटेक चोरांची टोळी गजाआड

एखादं निर्जनस्थळी असलेलं एटीएम शोधायचं... मग त्याची रेकी करायची.. एटीएममधल्या सीसीटीव्हीत चेहरे कैद होऊ नयेत म्हणून कॅमेऱ्याच्या वायर्सच कट करायच्या आणि मग संधी मिळताच अवघ्या दोन मिनिटात एटीएम घेऊन पोबारा करायचा

Sachin Salve | Updated On: Jan 11, 2018 07:23 PM IST

दोन मिनिटात अख्खं एटीएम उखडून गाडीत, हायटेक चोरांची टोळी गजाआड

वैभव सोनावणे, पुणे

11 जानेवारी : पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी एटीएम चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. पण तपासातून समोर आलेल्या चोरट्यांच्या  कारनाम्यांनी पोलीस ही चक्राऊन गेले आहे. अवघ्या दोन मिनिटांत चोरट्यांनी एटीएम मशीनच उखडून गाडीत टाकून पोबारा केलाय.

हॉलिवूडचा बहुचर्चित फास्ट अॅन्ड फ्युरियस - 4 हा चित्रपट पाहून त्यातील कल्पना प्रत्यक्षात वापरून एटीएम मशीन चोरून पैसे लंपास करणाऱ्या दिलीप मोरे (वय-52, रा.कोल्हापुर), शिरीज महमुद बेग जमादार, मोहीद्दीन जाफर बेग जमादार, तहसिलदार, मलीकजान हनिकेरी यांना अटक केलीये. अवघ्या दोन मिनिटांमध्ये एटीएम फोडून ते पळवून नेण्याची यंत्रणा या टोळक्यानं उभारली होती. या चोरट्यांनी चोरी करण्यासाठी एका स्कार्पिओ गाडीत हायड्रोलिक मॅकनिझमची यंत्रणाच  तयार केली होती.

आधी एखादं निर्जनस्थळी असलेलं एटीएम शोधायचं... मग त्याची रेकी करायची.. एटीएममधल्या सीसीटीव्हीत चेहरे कैद होऊ नयेत म्हणून कॅमेऱ्याच्या वायर्सच कट करायच्या आणि मग संधी मिळताच अवघ्या दोन मिनिटात एटीएम घेऊन पोबारा करायचा, ही या टोळक्याची मोडस ऑपरेन्डी होती.. याच पद्धतीनं त्यांनी खडकीतलं एटीएम दोनदा फोडलं. या चोरीत चोरट्यांनी 19 लाखांची रोकड लंपास केली. मात्र एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा केलेल्या चोरीमुळे हे चोरटे पकडले गेले.

कोणाचं डोकं कसं चालेल हे कुणीही सांगू शकत नाही. मात्र डोकं योग्य त्या; ठिकाणी चालायला हवं..ते चुकीच्या ठिकाणी चाललं तर काय होतं, हेच यातून दिसून आलंय..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2018 07:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close