बिल जास्त दिलं म्हणून रुग्णाने डाॅक्टरालाच भोसकलं

बिल जास्त दिलं म्हणून रुग्णाने डाॅक्टरालाच भोसकलं

हा धक्कादायक प्रकार सिंहगड रोडवरील नांदेड फाटा इथल्या सिंहगड स्पेशालिटी या रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी घडला.

  • Share this:

गोपाळ मोटघरे,पुणे

19 सप्टेंबर : उपचार करणाऱ्या डॉक्टरवरचं रुग्णाने हल्ला केल्याची घटना  पुण्यामध्ये घडलीये. बिल जास्त लावल्याच्या संशयावरुन रुग्णानेच डॉक्टरवर चाकुने हल्ला केलाय.

डॉक्टरने बिल वाढवून लावल्याच्या संशयावरून ७५ वर्षीय मारुती शिवराळे या रुग्णानं उपचार करणाऱ्या डॉक्टवर चाकूने हल्ला केला. हा धक्कादायक प्रकार सिंहगड रोडवरील नांदेड फाटा इथल्या सिंहगड स्पेशालिटी या रुग्णालयात सोमवारी संध्याकाळी घडला.

यामध्ये डॉक्टरच्या पोटावर आणि हाताला जखम झाली असून त्यांना तीन टाके पडले आहेत. डॉ. संतोष आवारी हे बीएचएमएस डॉक्टर आहेत. त्यांच्याकडे दम्याचा ७५ वर्षीय रुग्ण दाखल झाला होता. या रुग्‍णाला औषधोपचाराने बरे वाटत होते, पण आणखी ३ ते ४ दिवस दाखल करण्याची गरज होती. त्याला दारू सोडल्याचा त्रास होत होता, असे डॉक्‍टर आवारी यांनी सांगितलं.

डॉक्‍टर आवारी सायंकाळी सिंहगड हॉस्पिटलमध्ये राउंडसाठी त्या रुग्णाजवळ गेले असता मारुती शिवराळे यांनी चाकूने हल्ला केला.

रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला नव्हता म्हणून कोणतेही बिल केले नव्हते, असं डॉक्‍टर आवारी यांनी सांगितलं. या प्रकरणी हवेली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 11:27 PM IST

ताज्या बातम्या