S M L

फेसबुक टि्वटरवर #प्रिये हॅशटॅगची क्रेझ

Samruddha Bhambure | Updated On: Apr 13, 2017 12:24 PM IST

फेसबुक टि्वटरवर #प्रिये हॅशटॅगची क्रेझ

#प्रिये तू माझी लेट झालेली #लोकल

मी तुझा वैतागलेला प्रवासी..! #प्रिये

---------------------------------------तु इंडियन प्रिमियर लीग

तर मी रनजी मॅचेस #प्रिये

---------------------------------------

Loading...
Loading...

मी वादळी वारा

तू शांत संध्याकाळ #प्रिये

सध्याची तरूणाई ती आणि मी या दोन शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना दिसतीये. तसा ट्रेंडच सोशल मीडियावर सुरू झालाये. फक्त तू आणि मी... या दोन शब्दांत आपले विचार मांडण्याची आणि आपल्या भावना सांगण्याची  चढाओढ नेटकऱ्यांमध्ये लागली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आशाच काही 'आठवले स्टाई'च्या कवितांचा सोशल मीडियावर ट्रेंड सुरू असून फेसबुक, ट्विटर, जिथे बघाव तिथे #प्रिये या हॅशटॅगसह नेटकरी आपले विचार मांडत आहेत.

या हॅशटॅगचा जनक आणि त्यामागची कल्पना काय आहे, हे कोडंच आहे... पण असं म्हणतात की, नुकतच पार पडलेल्या हास्य कवी संमलेनात डॉ. सुनील जोगी या कवीने सादर केलेल्या 'मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्‍यार नहीं है खेल प्रिये' या कवितेमुळे हा ट्रेंड सुरू झाला आहे.

सोशल मीडियावर "आली लहर, केला कहर" सारख या ही हॅशटॅगला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे- मुंबई सारख्या ठिकाणी तर हा हॅशटॅग ट्रेंड होतोय.

या आधीही '#sixwordstories', '#amarphotostudio' या सारखे अनेक हॅशटॅग्जना नेटकऱ्यांनी उचलून धरलं होतं, आता 'प्रिये'ही तसंच काही झाल्याचं पाहायला मिळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 13, 2017 11:27 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close