सध्या अमेरिकेत गाजतंय लक्ष्मी बिराजदार यांचं नाव

News18 Lokmat | Updated On: Nov 30, 2018 06:32 PM IST

सध्या अमेरिकेत गाजतंय लक्ष्मी बिराजदार यांचं नाव

एकीकडे लोक पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र एक करतात. अशीच काहीशी जिद्द उरी बाळगून सोलापुरातील एका महिलेनं भाकरी बनवण्याच्या उद्योगातून मोठी भरारी घेतली आहे. तसचं अस्सल महाराष्ट्राचं धान्य असलेल्या ज्वारीला लौकिक प्राप्त करून दिलं आहे .पाहुयात या महिला उद्योजिकेची यशस्वी भरारी.

लक्ष्मीला अन्नपूर्णेची उपासना करताना आपण कधी पाहिलं नसेल. मात्र सोलापुरातील ज्वारीच्या पिठाला आकार देणारे हे हात आहेत लक्ष्मी बिराजदार या महिला उद्योजिकेचे. भाकरी म्हटलं की नाक मुरडणारे लोक सोलापूरची वाळलेली भाकरी आवर्जून चवीने खातात. त्याला कारणीभूत आहेत ते सोलापुरातील लक्ष्मी बिराजदार आणि त्यांच्यासारख्या होतकरू महिला.

बचत गटाच्या माध्यमातून लक्ष्मी यांनी वाळलेल्या भाकरीचा व्यवसाय सुरू केला आहे.

Loading...

लक्ष्मीताईंनी स्वतःसह दोन महिलांच्या सहाय्याने सुरू केलेल्या या व्यवसायाला भरारी घेण्यासाठी भांडवली पंखांची गरज होती. त्यासाठी खऱ्या अर्थाने साथ मिळाली ती कृषी विज्ञान केंद्राची आणि आत्मा या शासकीय संस्थेची.

यांच्या सहकार्यामुळे आज लक्ष्मीताईंच्या संतोषी माता महिला गृहउद्योगाने आपला व्यवसाय सातासमुद्रापार म्हणणजे थेट अमेरिकेपर्यंत नेलाय.

आजतागायत शेतकरी केवळ माल उत्पादित करीत आला. मात्र त्यावर प्रक्रिया करण्याचं तंत्र फारसं अवगत न केल्यामुळे शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय ठरतोय. मात्र याला अपवाद ठरतायत लक्ष्मीताई. कारण,

एक किलो ज्वारी विकल्यास साधारणपणे 16 ते 18 रुपये मिळतात. जर त्याच एक किलो ज्वारीवर प्रक्रिया केल्यास त्यातून प्रक्रिया खर्च वगळता जवळपास दीडशे रुपये प्रतिकिलो नफा मिळू शकतो.

खरंतर ज्वारी ही शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मात्र अलिकडच्या काळात ज्वारीबद्दल अनेक नकारात्मक गोष्टींची अफवा उठवली गेली आणि ती खोडून काढण्याचं काम सध्या कृषी विज्ञान केंद्र करत आहे.

लक्ष्मीताईंनी ज्वारीपासून केक, बिस्किट, रवा इत्यादी गोष्टी बनविल्या असून त्याला बाजारातून चांगली मागणीसुद्धा मिळतेय.

लक्ष्मीताईंच्या या संतोषी माता गृहउद्योगाचा ब्रॅन्ड आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. मोठमोठ्या हॉटेलसह सर्वसामान्य खवय्येदेखील लक्ष्मीताईंकडूनच भाकरी घेऊन जातात.

लक्ष्मी बिराजदार यांच्या या उद्यमशीलतेमुळे त्यांच्यासोबत आसपासच्या 10-20 महिलांना रोजगार मिळाला आहे.

लक्ष्मीताईंना त्यांच्या या संपूर्ण कामात मोलाची साथ मिळतेय, ती त्यांचे पती सुरेश बिराजदार यांची.

ज्वारी ही सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. मात्र मागील काही काळात त्याची जागा उसाने घेतल्याने ज्वारी मागे पडत आहे. परंतु लक्ष्मी बिराजदार यांच्यासह अनेक महिलांनी त्याला नवी ओळख आणि वलय निर्माण करून देण्याचा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह आहे. प्रतिनिधी सागर सुरवसे यांचा रिपोर्ट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2018 08:17 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...