उद्योजिकेची यशोगाथा, 2 रुपयांचा चिप्स व्यवसाय थेट नेला कोट्यावधींच्या घरात

जिद्द चिकाटी असेल तर काहीही साध्य होऊ शकते हे दाखवून दिलं आहे अमरावतीतल्या एका महिलेने. पाहुयात या यशस्वी उद्योजिकेची कहाणी.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2018 08:00 AM IST

उद्योजिकेची यशोगाथा, 2 रुपयांचा चिप्स व्यवसाय थेट नेला कोट्यावधींच्या घरात

संजय शेंडे, प्रतिनिधी

अमरावती, 26 ऑक्टोबर : जिद्द चिकाटी असेल तर काहीही साध्य होऊ शकते हे दाखवून दिलं आहे अमरावतीतल्या एका महिलेने. 2 रुपयांचे चिप्स विकून सुरू केलेला व्यवसाय आज कोट्यावधींच्या घरात गेला आहे. पाहुयात या यशस्वी उद्योजिकेची कहाणी.

झारखंडमधील रांची इथल्या निशा सोनारे यांनी MBA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. लग्नानंतर त्या अमरावतीमध्ये स्थायिक झाल्या. तिथं काही दिवस त्यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरी केली. मात्र त्यांची ओढ होती ती व्यवसायाकडे.

खरं तर व्यवसाय करण्यास घरच्यांनी प्रचंड विरोध केला. या विरोधाला डावलून त्यांनी घरच्या घरीच चिप्स तळून विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर घरीच डिस्टिल्ड वॉटरचा व्यवसायही सुरू केला. बरं इतकंच नाही तर 7 वर्षांपूर्वी अंजनगाव बारी इथं अडीच एकर शेत घेऊन स्पेशल बायोकेम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी त्यांनी स्थापन केली.

Loading...

या कंपनीमार्फत फर्टिलायझरचं उत्पादन सुरू केलं. आता या कंपनीतील उत्पादनाची विक्री एका नाही तब्बल 11 राज्यांत होते. त्यामुळे निशा सोनारे यांनी शेकडो महिला आणि पुरुषांना रोजगारही मिळवून दिला आहे.

बरं त्यांचा हा व्यवसाय प्रवास इतक्यावर थांबला नाही तर त्याला त्यांनी आधुनिकतेचीही जोड दिली. आज सगळेच जण प्राधान्य देतात ते ऑनलाइन खरेदीला. त्यामुळे ऑनलाईन पद्धत्तीने निशा यांनी आपला उद्योग आणखी विकसित केला आणि सोबत प्लॅस्टिक कंटेनर आणि पेस्टीसाईडचा व्यवसायही सुरू केला आहे.

ज्या लोकांनी निशा यांना उद्योगासाठी विरोध दर्शवला होता आज तेच सगळेजण, निशा यांच्या कामासाठीची तप्तरता, जिद्द, चिकाटी आणि यश पाहून निशाचं कौतुक करत आहेत. अशा महिला राज्यातल्या सगळ्याच महिलांचा आणि राज्याचाही अभिमान आहेत.

VIDEO : Facts Is Facts Baby, उदयनराजेंची तुफान फटकेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2018 08:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...