'प्लेबाॅय'चं नेहरू कनेक्शन, 'त्या' मुलाखतीमुळे उडाला होता हाहाकार !

'प्लेबाॅय'चं नेहरू कनेक्शन, 'त्या' मुलाखतीमुळे उडाला होता हाहाकार !

प्लेबाॅय मासिक लाँच झाल्यानंतर 10 वर्षांनंतर भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची मुलाखत घेतली होती.

  • Share this:

28 सप्टेंबर : अॅडल्ट मासिक प्लेबाॅयचे संस्थापक ह्यू हेफनर यांनी 91 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. प्लेबाॅय मासिक लाँच झाल्यानंतर 10 वर्षांनंतर भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची मुलाखत घेतली होती.

नेहरू यांची मुलाखत आॅक्टोबर 1963 ला प्रसिद्ध करण्यात आली होती. नेहरूंची ही मुलाखत अत्यंत वादग्रस्त ठरली होती.

नेहरूंच्या मुलाखतीआधी प्लेबाॅय मासिकाला भारतात बंदी होती. पण जेव्हा नेहरूंची मुलाखत प्रसिद्ध झाली तेव्हा प्लेबाॅय मासिकाचं नाव भारतात चर्चेत आलं.

एवढंच नाहीतर या मासिकाची तस्करी होऊ लागली. दुसऱ्या देशाच्या तुलनेत भारतात प्लेबाॅय मासिक 30 टक्के वाढीव किंमतीने विक्री होत होती.

या मुलाखतीत जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या सुरक्षेसाठी आण्विक शस्त्रे गरजेची आहे असं म्हटलं होतं. तसंच भविष्यात देशाच्या विकासाबद्दल आम्ही कटिबद्ध असून सकारात्मक आहोत अशी ग्वाही नेहरूंनी दिली होती.

मात्र, प्लेबाॅय सारख्या मासिकाच देशाच्या पंतप्रधानांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यामुळे एकच गदारोळ झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा प्लेबाॅयमध्ये नेहरूंची मुलाखत प्रिंटिंगसाठी शेवटच्या टप्प्यात होती तेव्हा भारतीय दुतावासाकडून निरोप देण्यात आला होता. भारतीय दुतावासाने या मुलाखतीला विरोध दर्शवला होता.

पण, भारतीय दुतावासाच्या विरोधानंतर प्लेबाॅयने खुलासा केला होता. आम्ही नेहरूंची मुलाखत प्रसिद्ध करणार नाही. फक्त त्यांच्या भाषणातील मुद्दे एकत्र करून प्रसिद्ध करणार आहोत असा दावा केला होता.

First published: September 28, 2017, 9:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading