'सोशलकल्लोळ','घरासमोर गाडी लावली तर गाडीला कॅरीबॅग अडकवली जाईल'!

'सोशलकल्लोळ','घरासमोर गाडी लावली तर गाडीला कॅरीबॅग अडकवली जाईल'!

  • Share this:

मुंबई, 23 जून : राज्यभरात आजपासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. ठिकठिकाणी प्लास्टिक वापरणाऱ्यावर धडक कारवाई सुरू आहे. आता सोशल मीडियावर प्लास्टिक बंदीवर चर्चा झाली नाहीतर नवलचं..."जर सोसायटीच्या गेटसमोरवर गाडी लावली तर हँडलला कॅरीबॅग लावली जाईल" असा इशारा देणारे व्हाॅट्सअॅपवर मॅसेज गंमतीने शेअर होतं आहे. यातील काही हे निवडक मजेदार जोक्स...

==========================================================

हा ड्रेस घातलेली माणूस दिसला की हातातील पिशवी पट्कन टाकून द्या...

=============================================

नविन धमकी...

तू  नुस्ता गाडी पार्क कर...

नाही तुझ्या हॅण्डलला

 carry bag  अडकवली तर बघ......

 

=============================================

नवी अफवा...

प्लॅस्टिक'वरचे नुसते जोक्स फॉरवर्ड केल्यानेही ३ हजारांचा  दंड आहे  म्हणे.

=============================================

बरं झालं,प्लास्टिकबरोबर काचेवर बंदी नाही आली ती..

नाहीतर दारूच्या दुकानावर तांब्या घेऊन जायला लागलं असतं

  मी पीत नाही, पण मित्रांची काळजी

================================================

आधी तांदळाच्या डब्यातल्या नोटा काढायला लावल्या.

आता गादीखालच्या पिशव्या...

या प्लास्टिकवर बंदी नाही!

 

======================= =========================

बरं झालं,प्लास्टिकबरोबर काचेवर बंदी नाही आली ती..

नाहीतर दारूच्या दुकानावर तांब्या घेऊन जायला लागलं असतं

  मी पीत नाही, पण मित्रांची काळजी

आता गादीखालच्या पिशव्या...

================================================

प्लास्टिक पिशवी हातात दिसली तर नागरिकांना रु. ५००० दंड

निर्णय चांगला आहे

पण रस्तात खड्डे दिसले तर पालिकेला व नगरसेवकाला किती दंड

राज्यभरात प्लास्टिक बंदीसाठी धडक कारवाई, लाखांचा दंड वसूल

 

================================================

अरे वेड्या... रविवारी कुठे ऑफिस  ला निघालास..

काका ऑफिस कुठे...   क्वार्टर आणायला चाललो.. प्लास्टिक बंद झाल्या मुळे..ऑफिस ची बॅग घेऊन चाललो..

=================================================

'सिंघम'चा प्लास्टिकबंदीला पाठिंबा,पण जाहिरात केलेल्या पान मसाल्याचा सर्वात जास्त कचरा !

Hi

Dear All,

आज मी काही अपरिहार्य कारणामुळे तुमच्या सगळ्यांपासून  दूर जात आहे. अनेक वर्षांपासून आपण एकत्र आहोत पण आयुष्यात असे प्रसंग  येतात की आपल्याला एकमेकांपासून दूर जाणं भाग पडतं.

मला वाटत नाही की मी परत येईन. भविष्यात कधी चुकून भेट झालीच तर मला ओळख दाखवा.

आजपर्यंत तुम्ही जे मला प्रेम दिलं त्याबद्दल Thanks !

तुमची लाडकी,

प्लँस्टिकची पिशवी

 

===========================================================

बघ माझी आठवण येते का?

चिकन मटण कापलं जात असताना खाटकासमोर

कापडाची, कागदाची पिशवी घेऊन रांगेत उभा राहा  

मच्छीमार्केटमधे कोळणीसमोर रिक्तहस्ते उभा राहून पहा

हात लांबव, तळहातांवर झेल मच्छीचं पाणी, इवलसं तळं पिउन टाक,

….. बघ माझी आठवण येते का ?

 

कापडाची मोठी पिशवी घेऊन किराणा दुकानात जा

महिन्याभराचं सामान छोट्या-मोठ्या कागदी पिशव्यात घे

घरी येईस्तोवर गहू रव्यात अन तांदूळ मैद्यात गेलेला असेल

चाळणी घेऊन गहू, रवा, तांदूळ, मैदा चाळून वेगळा कर

….. बघ माझी आठवण येते का ?

 

ऐन वेळी गावी जायला ट्रेनचं बुकिंग मिळणार नाहीच

कुरकुर करीत नाईलाजाने एसटीत बसशील

घाट पार करता करता तुला उलटी येऊ लागेल

कागदी पिशवी, बसची खिडकी, हाताची ओंजळ

उलटीचं घाण पाणी  या सगळ्यांना पुरून उरेल

….. बघ माझी आठवण येते का ?

 

 

ऑफिसहून येताना नेमका पाऊस सुरु होईल

छत्री ऑफिसमध्येच राहिलेली असेल

तू पाठीवरची बॅग डोक्यावर धरशील

डोकं, केस शाबूत राहिल्याचं समाधान मिळेल

पाऊस सरल्यावर बॅगेतली कागदपत्रे भिजल्याची जाणीव होईल

पावसाचं पाणी पिऊन लॅपटॉपने आत्महत्या केलेली असेल

दरवर्षी तुंबणारा रस्त्यातला नाला मात्र खळाळून वाहत असेल

येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,

….. बघ माझी आठवण येते का ?

 

(A Poem by प्लॅस्टिकची पिशवी)

=====================================

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 23, 2018 07:13 PM IST

ताज्या बातम्या