'ओएसएक्स'वरची गाडी पळवली, फेसबुक फ्रेंड रिक्वेश्टने अद्दल घडवली

ओएलएक्स सारख्या वेबसाईट्सवर मोटरसायकल विकणाऱ्यांना लुबाडणं हा याचा धंदा...नाव आहे राहुल प्रजापती...

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2017 11:52 PM IST

'ओएसएक्स'वरची गाडी पळवली, फेसबुक फ्रेंड रिक्वेश्टने अद्दल घडवली

गोविंद वाकडे,पिंपरी चिंचवड

28 डिसेंबर : फेसबुक...आपण सगळेच फेसबुकचा वापर फोटो शेअरिंगसाठी, चॅटिंगसाठी आणि फ्रेंडशिप वाढवण्यासाठी करतो. मात्र पिंपरीतल्या एका तरूणीनं फेसबुकचा वापर एका चोराला जन्माची अद्दल घडवण्यासाठी केलाय. कशा प्रकारे त्या धाडसी आणि हुशार तरूणीनं फेसबुकच्या मदतीनं चोराला गजाआड केलंय.

या पठ्ठयाचा चेहरा निरखून पाहा..ओएलएक्स सारख्या वेबसाईट्सवर मोटरसायकल विकणाऱ्यांना लुबाडणं हा याचा धंदा...नाव आहे राहुल प्रजापती...

मात्र शेरास सव्वाशेर भेटतोच तसंच पिंपरीतल्या दापोडीमध्ये राहणाऱ्या आरजू मनियारनं आरोपी राहुल प्रजापतीचा पर्दाफाश केलाय. आरजू मनियारचे वडील परवेज मनियार यांनी आपली जुनी मोटरसायकल विकण्यासंदर्भात ओएलएक्सवर पोस्ट टाकली. राहुलनं त्याला प्रतिसाद दिल्यानंतर मनियार यांनी लहान मुलाला मोटरसायकल दाखवण्यासाठी धाडलं.

आरोपी राहुलनं मोटरसायकल पळवून नेल्यानं मनियार यांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली. मात्र त्यांची मुलगी आरजूनं राहुलला धडा शिकवण्यासाठी शक्कल लढवली.

Loading...

तीनं फेसबुकवर आरोपी राहुल प्रजापतीचं प्रोफाईल शोधलं आणि त्याच्याशी ऑनलाईन मैत्री केली.

राहुल आरजूच्या जाळ्यात पुरता अडकला. हीच संधी साधत आरजूनं त्याला भेटण्यासाठी बोलावलं.

आणि पोलिसांनी राहुल प्रजापतीच्या मुसक्या आवळल्यात. तो मुळचा इंदापूरचा रहिवासी असून त्यानं अशा प्रकारे किती जणांच्या मोटरसायकल पळवल्या आहेत, याचा पुणे पोलीस तपास करताहेत. तुम्हाला सुद्धा ओएलएक्सवर एखादी वस्तू विकायची असेल तर अशा भामट्यांपासून सावधान...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 11:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...