• Home
  • »
  • News
  • »
  • special-story
  • »
  • कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती प्रदूषणकारी !-राष्ट्रीय हरित लवाद

कागदी लगद्याच्या गणेशमूर्ती प्रदूषणकारी !-राष्ट्रीय हरित लवाद

हरित लवादाने दिलेल्या निर्णयानुसार कागदी लगद्यापासून तयार होणाऱ्या मूर्ती या पीओपीच्या मूर्तीपेक्षा ५ हजारपट अधिक प्रदूषण करतात. पाण्याच्या प्रदूषणामध्ये सर्वात जास्त प्रदूषणकारी या मूर्ती ठरल्याय.

  • Share this:
मुंबई, प्रणाली कापसे, प्रतिनिधी गणशोत्सव जवळ आला की चर्चा सुरु होते प्रदूषणासंबंधी...लहान मुलांना शाळांमधून इको फ्रेंडली गणेशोत्सवाबाबत सांगितलं जातं. मग लहान मुलं पण आई-बाबांच्या मागे लागून इको फेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मागे लागतात. गणेशोत्सवात सगळ्यात महत्वाची असते ती गणेशमूर्ती..मग शोध सुरु होतो तो इको फ्रेंडली गणेशमूर्तीचा. ही मूर्ती शाडूच्या मातीची असावी, पीओपीची असावी की कागदी लगद्याची असावी, चॉकलेटची असावी नेमकी कशाची असावी यावर. आजवर या पर्यायांमधे बरेचदा कागदाच्या लगद्याच्या मूर्तीला प्राधान्य दिलं जातं होतं. पण ही बातमी तुमच्या याच विश्वासाला तडा देणारी आहे. कारण कागदी लगद्याची मूर्ती ही प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीपेक्षा ही जास्त हानीकारक आणि प्रदूषणकारी आहे. हे आम्ही म्हणत नाही तर हे म्हणणं आहे राष्ट्रीय हरीत लवादाचे! हरित लवादाने दिलेल्या निर्णयानुसार कागदी लगद्यापासून तयार होणाऱ्या मूर्ती या पीओपीच्या मूर्तीपेक्षा ५ हजारपट अधिक प्रदूषण करतात. पाण्याच्या प्रदूषणामध्ये सर्वात जास्त प्रदूषणकारी या मूर्ती ठरल्याय. हिंदू जनजागरण समितीचे सदस्य शिवाजी वटकर यांनी टाकलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हरीत लवादाने हा निर्णय दिलाय. मुख्य म्हणजे राज्य सरकारने ही कोणतंही संशोधन न करता २०११ ला जीआर काढून कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना प्रोत्साहन दिलं होतं. शिवाजी वटकर यांनी त्यावर ही आक्षेप घेतलाय. इतकचं नाही तर राष्ट्रीय हरीत लवादाने चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देणारा जीआर काढल्याबद्दल राज्य सरकारची कान उघाडणी केलीय. वटकर यांनी भारतातल्या संशोधकांकडून, माटूंग्याच्या केमीकल इंजिनिअरींग इन्स्टीट्यूट यांच्याकडून संशोधन करवून घेतलय. हेच अहवाल त्यांनी हरीत लवादासमोर सादर केले. त्यामुळेच या खटल्याचा निर्णय त्यांच्या बाजूने लागलाय. लवादानं सप्टेंबर २०१६ला हा निर्णय दिलाय तरी अजूनही राज्य सरकारनं संभ्रम पसरवणारा आपला जीआर मागे घेतलेला नाही. त्यामुळे अखेर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हिंदू जनजागरण मंचानं पुढाकार घेवून पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय. त्यांचं लोकांना आवाहन आहे की ज्यांनी प्रदूषण होऊ नये म्हणून कागदाच्या लगद्याची मूर्ती आणण्याचं ठरवलं असेल त्यांनी अशी मूर्ती आणू नये. त्याएवजी शाडूची मूर्ती आणल्यास तुमचा गणेशोत्सव हा खऱ्या अर्थी इको फ्रेंडली गणेशोत्सव होईल.
First published: