चार वर्षांनंतर गडकरी बीडमध्ये, पंकजा मुंडे-गडकरी राजकीय मनोमिलन !

राजकारणात कधीच कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो त्याप्रमाणे... नितीन गडकरी यांना चार वर्षांनंतर पंकजा मुंडेंनी सन्मानानं बीड जिल्ह्यात आमंत्रित केलं.

Sachin Salve | Updated On: Apr 24, 2018 11:00 AM IST

चार वर्षांनंतर गडकरी बीडमध्ये, पंकजा मुंडे-गडकरी राजकीय मनोमिलन !

सिद्धार्थ गोदाम,बीड           

19 एप्रिल : आज मराठवाड्यातील नांदेड परभणी आणि अंबेजोगाई येथे मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कार्यक्रम आयोजित केले गेले. हजारो कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ झाला...पण याच सोबत आणखी ऐका गोष्टीचाही शुभारंभ झाला.. तो म्हणजे नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे यांच्यातल्या राजकीय मनोमिलनाचा...

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातले राजकीय मतभेद सर्वश्रूत होते. त्या पार्श्वभूमीवर मुंडेंच्या बीड जिल्ह्यात नितीन गडकरी आणि पंकजा मुंडे यांची एकाच व्यासपीठावरची ही उपस्थिती मराठवाड्यात चर्चेचा विषय ठरलीय. त्यांचं एकत्र येणं हे गडकरी मुंडे गटाच्या मनोमिलनाची नांदी मानली जातीय.

राजकारणात कधीच कुणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो त्याप्रमाणे... नितीन गडकरी यांना चार वर्षांनंतर पंकजा मुंडेंनी सन्मानानं बीड जिल्ह्यात आमंत्रित केलं. नितीन गडकरींनीही बीडला हजारो कोटींचा निधी देत आपल्या मनात काही नसल्याचं कृतीतून दाखवलं.

महाराष्ट्रानं भाजपमध्ये कायम मुंडे-गडकरी गटाचा संघर्ष  पाहिला. पण मुंडेंच्या अपघाती निधनानंतर पंकजा मुंडेंनी गडकरींशी जुळवून घेत नव्या राजकारणाला सुरुवात केलीय. मनोमिलनाची ही घटना मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टीनंही सकारात्मक पाऊल ठरू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2018 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close