पुलंच्या घरी चोरीचा प्रयत्न करणारा चोर सापडला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 25, 2018 11:51 PM IST

पुलंच्या घरी चोरीचा प्रयत्न करणारा चोर सापडला

अद्वैत मेहता,पुणे

25 जून : अखिल महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व असलेल्या दिवंगत साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न करणाऱ्या मते पुस्तकांशिवाय काहीच न मिळाल्याने चोरी न करता हात हलवत परत गेलेल्या चोराच्या मुसक्या बांधण्यात पुणे पोलिसांना यश आलंय.

19 डिसेंम्बर 2017 रोजी पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील मालती माधव अपार्टमेंट मधील दिवंगत साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आणि पुस्तकाच्या खजिन्याशिवाय काहीच नसल्याने चोरी झालीच नाही अशी चर्चा रंगली.

जितसिंग टाक हा तो बहाद्दर निघाला ज्याला पुणे पोलिसांनी पकडलं आणि जितसिंग यानेही या घरात पुस्तकांशिवाय काहीच नव्हतं म्हणून चोरी केली नाही अशी कबुली दिली यामुळं आम्हा घरी शब्दांचीच रत्ने या उक्तीचा प्रत्यय आला.

आपण कुणाच्या घरी चोरी करतोय हेही त्याला माहित नव्हतं पु ल हे मोठे लेखक आहेत हेही बापड्याला माहीत नाही. विशेष म्हणजे या चोराने आणखी 3 घरी डल्ला मारायचा प्रयत्न केला,त्यात तो यशस्वीही झाला इतर घरातून त्याने चोरलेला सोन्याच्या मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला.

Loading...

आरोपी हा क्रिकेट खेळतो हे लक्षात घेऊन पोलिसांनी क्रिकेट टीम बनवून मॅच खेळण्याचा प्लॅन आखत आरोपीला चतुर्भुज केलं.

आता चोरी वेळी खुद्द पु ल घरात असते तर त्यांनी चोराची विचारपूस करत 2 घास खावून जा म्हणत 2,4 पुस्तकेही भेट दिली असती किंवा स्वर्गात पु ल याना ही घटना,बातमी समजली तर पु ल खास मिश्किल शैलीत या न झालेल्या चोरीवरही कथाकथन करतील किंवा खुसखुशीत लेख लिहितील यात आम्हाला तरी शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 25, 2018 11:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...