S M L

हाच खरा 'शाहीविवाह' !,लग्नाचा खर्च टाळून कुष्ठरोग पीडितांना केली मदत

विशाल समुद्रे आणि रेश्मा चव्हाण या तरूण जोडप्यानं आपल्या लग्नात होणारा खर्च टाळून तो कुष्ठधाम या कुष्ठरोग पीडितांसाठी मदत म्हणून वापरलाय.

Sachin Salve | Updated On: Nov 25, 2017 11:28 PM IST

हाच खरा 'शाहीविवाह' !,लग्नाचा खर्च टाळून कुष्ठरोग पीडितांना केली मदत

25 नोव्हेंबर : उस्मानाबादमध्ये एक आगळावेगळा विवाहसोहळा पार पडलाय. विशाल समुद्रे आणि रेश्मा चव्हाण या तरूण जोडप्यानं आपल्या लग्नात होणारा खर्च टाळून तो कुष्ठधाम या कुष्ठरोग पीडितांसाठी मदत म्हणून वापरलाय.

विशाल समुद्रे चं  शिक्षण बी फार्मसी झालेला आहे. तर वधू रेश्मा चव्हाणचंही एमएससी नर्सिंगमध्ये शिक्षण पूर्ण झाले. सध्या नर्सचा जॉब करत आहे. दोघांचा ही आरोग्य क्षेत्राशी आणि रुग्णांशी नेहमीच संबंध येतो. त्याच भावनेतून नवरी मुलीने मनात आलेला हा उपक्रम घरी बोलून दाखवला. त्याला केवळ घरच्यांनीच नाहीतर नवरदेवाने ही होकार दिला.

नुसता होकारच नाही तर लग्नाच्या प्रत्येक वाढदिवस अशाच पद्धतीने करण्याचा निश्चय केलाय. आपण पीडित आहोत निराधार आहोत अशा संकटाच्या काळात चक्क वर-वधूने हा आपला आदर सत्कार केल्याने कुष्ठरोग पीडित नागरिक ही भावूक झाले असून जीवनातील हा सगळ्यात मोठा सन्मान आहे अशी भावना पीडितांनी व्यक्त केली.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 25, 2017 11:28 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close