S M L
Football World Cup 2018

फेरीवाल्यांवर कारवाई : मागणी कुणाची आणि श्रेय कोण घेतंय?

ही कारवाई आपल्या मागणीनंतर केली असल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. सेनेच्या या दाव्यावर मनसेनं मौन पाळलं आहे. तरी सोशल मीडियावरुन मात्र हे प्रकरण तापू लागलंय.

Sonali Deshpande | Updated On: Oct 8, 2017 05:34 PM IST

फेरीवाल्यांवर कारवाई : मागणी कुणाची आणि श्रेय कोण घेतंय?

प्रणाली कापसे, मुंबई, 08 आॅक्टोबर : रेल्वे प्रशासनानं पुलांवर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई केलीय. ही कारवाई आपल्या मागणीनंतर केली असल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. सेनेच्या या दाव्यावर मनसेनं मौन पाळलं आहे. तरी सोशल मीडियावरुन मात्र हे प्रकरण तापू लागलंय.

मुंबईतल्या काही भागातील रेल्वे ब्रीज फेरीवालामुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. मनसेच्या संताप मोर्चानंतर रेल्वे प्रशासनानं ही कारवाई करायला सुरुवात केली असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र या कारवाईचं श्रेय स्वतः घेऊ पाहताहेत.

त्यावर मनसेकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नसली तरी मुंबई हॉकर्स  युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी मात्र हॉकर्सना त्याठिकाणी धंदा करण्यासाठी सत्ताधारींपासून, बीएमसी अधिकारी, पोलिसांना, स्थानिक गुंडांना हप्ता द्यावा लागतो. शिवाय हे कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन आहे अशी प्रतिक्रिया हॉकर्स युनियनं दिलीय.

मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात फेरीवाल्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सुनावणी होणार आहे. त्यावेळी न्यायालयाच्या निर्णयावर शिवसेना नेमकी काय भूमिका घेते हे पहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2017 05:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close