आता रेल्वेच्या प्रत्येक कोचेसमधून हटवणार एक-एक टॉयलेट !

आता रेल्वेच्या प्रत्येक कोचेसमधून हटवणार एक-एक टॉयलेट !

आता रेल्वे मंत्रालयाने 40,000 कोचमधून एक टॉयलेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे

  • Share this:

4 ऑगस्ट: भारतीय रेल्वेच्या प्रत्येक कोचमध्ये दोन टॉयलेट्स असतात. पण आता रेल्वे मंत्रालयाने 40,000 कोचमधून एक टॉयलेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमध्ये प्रत्येक कोचमध्ये कॅटरिंगचं सामान ठेवायला जागा मिळावी म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

सध्या रेल्वेमध्ये खाण्याचं सामान ठेवायला जागाच नाहीय. त्यामुळे खाण्याचं सामान हे टॉयलेटच्या जवळ ठेवावं लागतं जे स्वच्छता आणि आरोग्य दोन्हीच्या दृष्टीने चांगलं नाही. रेल्वेच्या नियंत्रक महालेखापरीक्षकानेही आपल्या रिपोर्टमध्ये हेच सांगितलं आहे.

तसंच 13 जूनपासून रेल्वेचं मिशन रेफ्रो फिटमेंट सुरू झालंय. या  मिशनमध्ये येत्या पाच वर्षांत रेल्वेचे कोचेस स्वच्छता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन नव्याने डिझाईन केले जाणार आहे.

तसंच सध्या जर्मन डिझाईनच्या नव्या 5000 कोचेसमध्ये चार टॉयलेट्स असून हे कोचेस सध्या रेल्वेमध्ये वापरात आहे. या 5000 एल.एच.बी. कोचेसमध्ये खाण्यापिण्याचं सामान ठेवायची वेगळी जागाही आहे. असे अनेक एल.एच बी कोचेस भविष्यात बनवण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतलेला आहे.

First published: August 4, 2017, 9:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading