• Home
  • »
  • News
  • »
  • special-story
  • »
  • न्योकूम-अरूणाचल प्रदेशची होळी

न्योकूम-अरूणाचल प्रदेशची होळी

अरूणाचलमधल्या निशी जमातीचे लोक हा सण साजरा करतात. ही लोक याजली गावात खूप मोठ्या प्रमाणात सापडतात.

  • Share this:
02 मार्च: होळीचा सण सगळ्या उत्तर भारतात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.  पश्चिम भारतातही होळीची प्रचंड धूम असते. पण आदिवासी जमातींनी भरलेल्या पुर्वोत्तरी राज्यांमध्ये होळी साजरं करण्याचं प्रमाण कमी आहे. पण अशाच अरूणाचल प्रदेशमध्ये  मात्र होळी सारखाच एक सण साजरा केला जातो. तो म्हणजे न्योकूम   न्योकूमचा सण अरूणाचलमध्ये 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जातो. या सणाचे चार दिवस गावोगावी प्रचंड धूम असते. एकीकडे  देशभर होळीला डीजे लावला जातो. प्रचंड धांगडधिंगा केला जातो. पारंपारिक होळी कुठे हरवत चालली आहे का अशी टीका होते. पण दुसरीकडे अरूणाचल प्रदेशमधला न्योकूम मात्र अजूनही   पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो. चारही दिवस गावातले लोक मस्ती करतात . पारंपारिक नृत्य करतात ,लोकगीतं गातात. गावात मेजवानी दिली जाते. अरूणाचलमधल्या निशी जमातीचे  लोक हा सण साजरा करतात. ही लोक याजली गावात खूप मोठ्या प्रमाणात सापडतात. होळी हा रंगाचा उत्सव म्हटला जातोत तर न्योकूम  हा  उत्साहाचा उत्सव म्हटला जातो.  होळीच्या दिवशी घरातल्या जुन्या आणि टाकावू सामानाची होळी केली जाते तर न्योकूममध्येही अशाच प्रकारे दहन केलं जातं. दोन्हीकडे होळी वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे. फरक इतकाच आहे की न्योकूममध्ये  गवत जळक्या लाकड्यांपासून एक सैतानाचा पुतळा तयार केला जातो आणि त्याचं दहन केलं जातं. हा विधी शेवटच्या दिवशी केला जातो. तसंच इथे बळीची प्रथा अजूनही अस्तित्वात आहे. अशाप्रकारे अरुणाचलमध्ये न्योकूमचा होळीच्या सारखाच सण साजरा केला जातो. या सणावरून प्रेरित होऊन अरूणाचलमध्ये गेली 50 वर्ष न्योकूम फेस्टिवलसुद्धा आयोजित केला जातो. न्योकूमच्या मान्यतेनुसार या सणाच्या शेवटच्या दिवशी पाऊस पडतो. त्यासाठी लोकं परमेश्वराची प्रार्थनाही करतात.
First published: