'ह्युमन लायब्ररी' आहे तरी काय?

'ह्युमन लायब्ररी' आहे तरी काय?

अभूतपूर्व कल्पना डेन्मार्कच्या रॉनी अॅबर्गलच्या डोक्यात आली .पुस्तकांच्या जागी माणसांची ग्रंथालये उभारली तर ? आणि2000 साली साकारली ह्युमन लायब्ररी.

  • Share this:

11 जून: तुम्ही लायब्ररीत नक्कीच जात असाल. त्यातून तुमच्या आवडीची पुस्तकं आणत असाल. पण अशी एखादी लायब्ररी, ज्यात तुम्ही माणूस वाचता. ही आहे ह्युमन लायब्ररी. ज्यात त्याचं आयुष्य त्याच्याच तोंडून ऐकता. मग कसं वाटेल? नुकताच असा एक इव्हेंट मुंबईत झाला.

आता ह्युमन लायब्ररी  म्हणजे नक्की काय? तर अनेक माणसं एकत्र येतात. त्यातले बहुतेक वाचक असतात . काही माणसं पुस्तकं असतात. वाचक या माणुसरूपी पुस्तकांभोवती एकत्र येतात. मग एक पुस्तक  आपली कथा  मांडते .वाचक कुठेही या माणुसरूपी पुस्तकाला थांबवू शकतात.त्याला कुठलेही  प्रश्न विचारू शकतात . कितीही अनकम्फर्टेबल ,कितीही अडचणीत आणणारे असले तरी.ते अपेक्षित असतात.आणि  अशा संवादातून ते  माणुसरूपी पुस्तक आपल्या आयुष्याची पानं उलगडत असतं.

अभूतपूर्व  कल्पना डेन्मार्कच्या रॉनी अॅबर्गलच्या डोक्यात आली .पुस्तकांच्या जागी माणसांची ग्रंथालये उभारली तर ?  आणि2000 साली  साकारली ह्युमन लायब्ररी. ह्युमन लायब्ररी या 2000 साली लावलेल्या रोपट्याची मोठी संस्था झाली.आणि ही संकल्पना जगभर पसरली . आज ह्युमन लायब्ररी चे इव्हेंट जगभर आयोजित केले जातात .लोक एकत्र येतात. पुस्तक कथा सांगतात.

ही माणुसरुपी पुस्तकं नक्की कोण असतात? हे सामान्यातले असामान्य असतात. मग एखादा कॉलेज ड्रॉप आउट असतो. एखादी बालपणी लैंगिक शोषण झालेली व्यक्ती असते .हे असतात सामान्यच पण वेगळी दु:ख जगलेली ,वेगळे अनुभव घेतलेली माणसं .

आजपर्यंत आपण पुस्तकं खूप वाचली.आता माणुस समजूया .माणुस उमजूया .चला माणुस वाचूया.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2017 05:54 PM IST

ताज्या बातम्या