आता म्हैसूर पाक कुणाचं?,कर्नाटक-तामिळनाडूमध्ये रस्सीखेच

दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय असलेल्या म्हैसूर पाकाची भौगोलिक ओळख मिळवण्यासाठी ही दोन्ही राज्ये एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 17, 2017 06:01 PM IST

आता म्हैसूर पाक कुणाचं?,कर्नाटक-तामिळनाडूमध्ये रस्सीखेच

17 नोव्हेंबर : पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये रसगुल्ला मिठाईवरुन सुरू असलेला वाद नुकताच संपला असताना आता आणखी एक वाद समोर आलाय. कर्नाटक आणि तामिळनाडू ही दोन्ही राज्ये म्हैसूर पाकावरुन आमनेसामने आली आहेत. म्हैसूर पाकाचा शोध आपल्याच राज्यात लागला, असा या दोन्ही राज्यांचा दावा आहे.

दक्षिण भारतात अतिशय लोकप्रिय असलेल्या म्हैसूर पाकाची भौगोलिक ओळख मिळवण्यासाठी ही दोन्ही राज्ये एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत.

मंगळवारीच रसगुल्ल्यावरुन बऱ्याच कालावधीपासून पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये सुरू असलेला संघर्ष संपला. या वादात पश्चिम बंगालची सरशी झाली. यानंतर आता म्हैसूर पाकावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. म्हैसूर पाकचा शोध नेमका कुठे लागला?, या पदार्थाला म्हैसूर (कर्नाटकचे जुने नाव) या ठिकाणावरुन नाव देण्यात आले का?, की हा पदार्थ तामिळनाडूमधून आला?, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

१८५३ मध्ये लॉर्ड मॅकेले यांनी भारतीय संसदेत बोलताना म्हैसूर पाकाचा उल्लेख केला होता. त्यामुळेच म्हैसूर पाकाचा शोध तामिळनाडूमध्येच लागला, असा दावा तामिळनाडूनं केलाय.

संसदेत २ फेब्रुवारी १८५३ रोजी भाषण करताना लॉर्ड मॅकेले यांनी म्हैसूर पाकाचा उल्लेख केला होता. "तुम्ही लोक यावर विश्वास ठेवणार नाही. मात्र, म्हैसूर पाकचा शोध एका मद्रासी व्यक्तीने लावला होता. बंगळुरुतील माझ्या एका मित्राने याबद्दलची माहिती मला दिली होती. तामिळ लोक मद्रासमध्ये म्हैसूर पाक बनवतात. ७४ वर्षांपूर्वी म्हैसूर पॅलेसमधील एका वकिलाने म्हैसूर पाकाची कृती चोरली होती. त्याने मरण्याआधी म्हैसूरच्या राजाला पाककृती सांगितली. त्यामुळे म्हैसूरच्या राजाने त्या खाद्यपदार्थाला म्हैसूर पाक असे नाव दिले, असे मॅकेले यांनी म्हटलं होतं.

Loading...

मात्र, कर्नाटकच्या लोकांनी तामिळनाडूतील जनतेचा दावा खोडून काढला आहे. मिठाईच्या नावावरुनच हा पदार्थ म्हैसूरमध्ये बनवण्यात आल्याचं स्पष्ट होतं, असा दावा कर्नाटकने केला. त्यामुळे आता या वादात नेमकी कोणाची सरशी होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 06:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...