S M L

विशेष : 'केरळ'सारखा महाप्रलय पिंपरी चिंचवडच्या वेशीवर ?

चिंचवड गावात नदी पात्रात 5 एकर पेक्षा जास्त जागेसह संपूर्ण पवनानदी काठी सुमारे 20 एकर जागेवर भराव टाकून अतिक्रमण केले आहे.

Updated On: Aug 20, 2018 10:42 PM IST

विशेष : 'केरळ'सारखा महाप्रलय पिंपरी चिंचवडच्या वेशीवर ?

गोविंद वाकडे,प्रतिनिधी

अक्षरशः थैमान घालत,शेकडो बळी घेऊन,निसर्गानं केरळच्या देवभूमीची स्मशानभूमी केलीये. देवाचं घर केरळ, सध्या जलसमाधीस्त आहे. पावसाचा जोर कमी झाल्यावर केरळच्या धरतीवरील पाणी ओसरेल, मात्र पुढची पन्नास वर्ष तरी केरळ वासियांच्या डोळ्यात अश्रुंचा महापूर कायम राहील. असं म्हणतात की, केरळच्या भूमिचा जन्म समुद्रातूनच झालाय, त्यामुळे समुद्र तळाला असणाऱ्या हिऱ्या मोत्यांसारखी समृद्धता ह्या भुतलावर बघायला मिळतीय. मात्र आता ह्या केरळच्या समृद्धतेला नजर लागलीय मानवी हस्तक्षेपाची...!!

संपूर्ण देश किंवा राज्य केरळच्या महाप्रलयाकडे बघून काय धडा घेईल हे सांगता यायच नाही. मात्र आज जे केरळमध्ये घडलंय, उद्या ते पिंपरी चिंचवड मध्येही घडणार हे निश्चित..

कारण निसर्गात मानवी हस्तक्षेप करणे हा जणू काही आपल्याला मिळालेला निसर्गदत्त अधिकाराचं आहे अश्या अविर्भावात सध्या पिंपरी चिंचवडचे कारभारी वागतायत आणि  कधी स्वता:च्या फायद्यासाठी तर कधी दुसऱ्यांने केलेल्या अतिक्रमणाकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करत त्यांनी आधीच निसर्गाला डिवचले आहे, अर्थात त्यांच्या ह्या पापात महापालिका प्रशासन खांद्याला खांदा लावून सहभागी नसेल तरच नवल.

चिंचवड गावात नदी पात्रात  5 एकर पेक्षा जास्त जागेसह  संपूर्ण पवनानदी काठी सुमारे 20 एकर जागेवर भराव टाकून अतिक्रमण केले आहे.

Loading...
Loading...

- नदीपात्रा लगतची ब्लू लाईन (सुरक्षित अंतर) कमी करण्यासाठी बंधारे फोडले

(जगाच्या पाठीवर फक्त पिंपरीमध्येच हे घडल असेल)

- शहरातील सर्व गटार नदीपात्रात सोडले उद्या ह्याच गटारीतून नदी घरात घुसेल

- 3 झोपड़पट्टी पुनर्वसन केंद्राच्या इमारती, 6 मैलाशुद्धीकरण केंद्र, 7 झोपड़पट्टी, 18  मंदिरे, 20 पेक्षा अधिक सोसायटी आणि 100 पेक्षा अधिक छोटी मोठी व्यावसायिक दुकानं

शहरातील साचलेल्या पाण्याला वाट मोकळी करून देणारे तब्बल 32 नाले बुझवून त्यावर आज टोलेजंग इमारती उभारल्या गेल्या आहे.

आणि आता नदी सुधारच्या नावाखाली बंदीस्त करण्याचा घाट

पिंपरी चिंचवडमधील, नद्यांचा अथांगपना, भव्यता, पवित्रता आणि स्वातंत्र्यावर केला गेलेला हा मानवी हस्तक्षेप बघून बुडाखाली आग लागते पण हे वास्तव हजार वेळा समाजापुढे मांडुनही ना समाज जागा होतोय ना कारभारी....

असं वाटते की, या शहराला वरदान म्हणून लाभलेल्या, ह्या पिंपरी चिंचवडमधून आज वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी ह्या तीन पवित्र नद्या, उद्या ह्या पिंपरी चिंचवड शहरालाच वाहून नेतील आणि ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

ज्या 41 नद्यांना अंगा खांद्यावर खेळवत केरळनं स्वतःच नंदनवन करवून घेतलं त्याच नदया आता केरळवासियांच्या डोळ्यातून वाहु लागल्यायत. त्यामुळे नद्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांनो आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यां अधिकाऱ्यांनो वेळीच जागे व्हा आणि केरळचा आक्रोश उघड्या डोळ्यांनी बघून उद्याचं दुसर केरळ होण्यापासून पिंपरी चिंचवड ला वाचवा..!

केरळमध्ये संकटमोचक ठरले नौदल, स्थानिकांनी असे म्हटले 'THANKS'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2018 10:41 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close