आंबेनळी घाटात जसा अपघात घडला तसे राज्यात 1 हजार 324 स्पाॅट !

आंबेनळी घाटात जसा अपघात घडला तसे राज्यात 1 हजार 324 स्पाॅट !

राज्यात गेल्या वर्षी असे 743 ब्लॅक स्पॉट होते आणि यावर्षी ही संख्या झालीय 1324 इतकी. म्हणजे यावर्षी या ब्लॅक स्पॉट च्या तुलनेत 78 टक्के वाढ झालीये. आंबेनळी घाटातील गेल्या महिन्यात अपघात ठिकाणही आता ब्लॅक स्पॉट आहे.

  • Share this:

स्वाती लोखंडे-ढोके, मुंबई 21 आॅगस्ट : तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर सुरक्षित घरी परताल याची ग्वाही सध्या कुणीही देऊ शकत नाही. कारण तुमच्या मार्गात अनेक यमदूत आवासून उभे आहेत. आंबेनळीच्या काळ दरीनं एक दोन नव्हे तब्बल 30 जणांना आपल्या मगरमिठीत घेतलं.राज्यभरातील रस्त्यांच्या माथ्यावर असे तब्बल 1 हजार 324  कलंक आहेत.ज्यांना व्यावहारिक भाषेत ब्लॅकस्पॉट म्हणून संबोधलं जातं.

धक्कादायक म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ब्लॅकस्पॉटच्या संख्येत दुपट्टीनं वाढ झालीय.

ब्लॅक स्पॉट म्हणजे नेमकं काय?

एकाच ठिकाणी तीन वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जीव गेला. तर त्या जागेला 'ब्लॅक स्पॉट' म्हटले जाते. दर तीन महिन्यांनी पोलिस या जागेचा आढावा घेतात. तसेच याचा अहवाल रस्ते आणि वाहतूकीसंदर्भातील इतर सरकारी यंत्रणांना दिला जातो. अपघात आणि मृतांची संख्या कमी झाल्यास 'ब्लॅक स्पॉट'मधून हे ठिकाणी वगळण्यात येते.

राज्यात गेल्या वर्षी असे 743 ब्लॅक स्पॉट होते आणि यावर्षी ही संख्या झालीय 1324 इतकी. म्हणजे यावर्षी या ब्लॅक स्पॉट च्या तुलनेत 78 टक्के वाढ झालीये. आंबेनळी घाटातील गेल्या महिन्यात अपघात ठिकाणही आता ब्लॅक स्पॉट आहे.

राज्यातील ब्लॅकस्पॉटमध्ये पहिला क्रमांक लागतो तो नाशिक ग्रामीणचा जिथे 107 ब्लॅक स्पॉट आहेत. तर त्याखालोखाल  नांदेडमध्ये 87, कोल्हापुरात 85 तर साताऱ्यात 84 ब्लॅक स्पॉट आहेत. राज्यात 63 ब्लॅक स्पॉटसह पाचवा क्रमांक लागतो तो औरंगाबाद ग्रामीणचा तर ठाणे शहर 59 ब्लॅक स्पॉटसह सहाव्या क्रमांकावर आहे.

खरं तर ब्लॅक स्पॉटला गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. ब्लॅक स्पॉट म्हणजे नुसतं अपघात प्रवणक्षेत्र नाही. कारण अख्खा घाट हा अपघात प्रवण असू शकतो पण ब्लॅक स्पॉट म्हणजे  १)500 मीटरचा सलग रस्ता २) मागच्या तीन वर्षात तिथे 5 असे अपघात ज्यात मृत्यू किंवा गंभीर इजा झाली असेल ३) किंवा मागच्या तीन वर्षात किमान 10 मृत्यू झाले असावे.

त्यामुळे राज्याच्या कोणत्याही रस्त्यावर फिरताना तुम्हीच तुमचे तारणहार आहात..हे ठेऊन घराबाहेर पडा...नाहीतर सरकार नावाच्या बुजगावण्यावर विश्वास ठेवाल आणि कोणता ब्लॅकस्पॉट तुम्हाला खड्ड्यात घालेल याचा नेम नाही.

VIDEO : अपघातानंतर आई-वडील पडले खाली, लहानग्यासोबत 500 मीटर धावली बाईक

First published: August 21, 2018, 11:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading