न्यूज 18 लोकमतचा दणका, पाच तासात गोदावरीतले अवैध होर्डिंग हटवले

न्यूज 18 लोकमतचा दणका, पाच तासात गोदावरीतले अवैध होर्डिंग हटवले

न्यूज 18 लोकमतनं गोदावरीतल्या अवैध होर्डिंगची बातमी दाखवली आणि 5 तासात झोपी गेलेली प्रशासन यंत्रणा जागी झाली.

  • Share this:

नाशिक, 09 एप्रिल :  न्यूज 18 लोकमतनं गोदावरीतल्या अवैध होर्डिंगची बातमी दाखवली आणि 5 तासात झोपी गेलेली प्रशासन यंत्रणा जागी झाली.  न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर गोदावरीतल्या अवैध बांधकामावर हातोडा चालवण्यात आलाय.  तसंच महानगरपालिकेच्या मुख्य अग्निशमन दलअधिकारी यांच्यावर गैरशिस्त वर्तनाबद्दल १ लाख रुपये दंड करण्यात आलाय.  तसंच वरिष्ठ लिपीक, वायरमन आणि एका शिपायला निलंबित करण्यात आलंय.

खरं तर नदीपात्रात कोणत्याही प्रकारचं तात्पुरतं किंवा कायमस्वरूपी बांधकाम करायला परवानगी नाही. पण अशा प्रकारच्या महाकाय जाहिरात फलकाच्या माध्यमातून लाखोंचं उत्पन्न जाहिरात एजन्सी कमवत आहेत. ते ही अधिकाऱ्यांच्या आदेशानं.  होर्डिंग्ज परवानगीचा सरकारी आदेश यात चक्क पाटबंधारे खात्याच्या उप कार्यकारी अभियंत्यांनच हा आदेश दिलाय. मात्र,मी फक्त सह्याजीराव, हे काम माझं नाही अशी बतावणी हे महाशय करताय.

न्यूज 18 लोकमतनं थेट पाटबंधारेच्या अधिक्षक अभियंत्यांना गाठलं. त्यांनी मात्र स्पष्ट भूमिका मांडली. फक्त पूररेषेची आखणी करण्याचेच आपल्याला अधिकार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सरकारी जीआर आणि थेट आदेश. एकाच कार्यालयात धूळफेक करणारी दोन कागदं अधिकारी कशी तयार करतात. पण न्यूज18 लोकमतनं हा गोरखधंदा उघडकीस आणला आणि प्रशासनानं थेट कारवाईचा इशारा दिला.

हा अधिकाऱ्यांचा मोठा आर्थिक झोल असल्याचा थेट आरोप याचिकर्त्यांनी केलाय. आता नदीपात्रातील हे वादग्रस्त अतिक्रमण कोणाच्या आशिर्वादानं याची चौकशी होणार हे स्पष्ट झालं असलं तरी अनेक वर्षांपासून ज्यांच्या आशीर्वादानं हा झोल सुरू होता ते चव्हाट्यावर येणार का हा खरा सवाल आहे.

न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल जिल्हाधिकारी , पालकमंत्री आणि महापालिका आयुक्तांना घ्यावी लागलीय. या अवैध बांधकामासाठी जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर लवकरच कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

First published: April 9, 2018, 11:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading