ड्रग्जला लॉर्ड शिवा, बुद्धा आणि दलाई लामा कोडवर्ड; सोशल मीडियावर ड्रग्ज पार्ट्यांचं थैमान

ड्रग्जला लॉर्ड शिवा, बुद्धा आणि दलाई लामा कोडवर्ड; सोशल मीडियावर ड्रग्ज पार्ट्यांचं थैमान

व्हॉट्सअॅप, फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावरून या पार्ट्यांची निमंत्रण सांकेतिक शब्दात फिरत असतात.

  • Share this:

27 डिसेंबर : नववर्षाच्या स्वागतासाठी अवघी मुंबई सज्ज झाली आहे. पण या सगळ्यात न्यू इयर सेलिब्रेशन दरम्यान होणाऱ्या अंमली पदार्थांच्या पार्ट्या रोखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावरून या पार्ट्यांची निमंत्रण सांकेतिक शब्दात फिरत असतात.

न्यू इयरसाठी रेव्ह पार्ट्यांचं सोशल मीडियाद्वारे आमंत्रण दिलं जातं आहे. पार्टी कुठं असेल? कधी असेल? याची माहिती सांकेतिक शब्दात दिली जातेय. पार्टीत मिळणाऱ्या अंमली पदार्थाचं नावही सांकेतिक शब्दात दिलं जातं.

या ड्रग्जला ब्रँडनुसार लॉर्ड शिवा, लॉर्ड बुद्धा आणि दलाई लामा असे सांकेतिक शब्द वापरले जातात. दलाई लामा हे यातलं सर्वात महागडं ड्रग्ज आहे.

OJO किंवा WHITE असे शब्द कोकेनसाठी वापरले जातात.

MD ड्रग्जसाठी लाईन किंवा बिस्किट असा शब्द वापरला जातो. तर गांजासाठी हर्बल वीड हा शब्दप्रयोग केला जातो.

हशीशसाठी #tag हा शब्द प्रचलित आहे.

बाजारात रोज नवनवे ड्रग्ज येतायत. रेव्ह पार्ट्यांच्या आयोजनासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जातात. तरी अंमली पदार्थविरोधी विभाग आणि पोलीस आपल्या परीनं या ड्रग्ज माफियांचा शोध घेऊन पार्ट्या उधळून लावण्याच्या प्रयत्नात आहे. पण आता पोलिसांना यात यश येतं का हे बघणंच महत्त्वाचं आहे.

First published: December 27, 2017, 4:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading