पुण्याला मागे टाकत नवी मुंबई पालिका ठरली सर्वात श्रीमंत महापालिका !

पुण्याला मागे टाकत नवी मुंबई पालिका ठरली सर्वात श्रीमंत महापालिका !

काटकसर आणि आर्थिक नियोजन केल्याने 2 हजार कोटींची ठेवी असणारी श्रीमंत महापालिका ठरलीये.

  • Share this:

विनय म्हात्रे, नवी मुंबई

24 नोव्हेंबर : पुणे, पिंपरी चिंचवड आणि ठाणे या अ आणि ब वर्गांच्या महापालिकांना मागे टाकत नवी मुंबई महापालिका राज्यातली मुंबई महापालिका वगळता सर्वात श्रीमंत महापालिका ठरलीये. काटकसर आणि आर्थिक नियोजन केल्याने 2 हजार कोटींची ठेवी असणारी श्रीमंत महापालिका ठरलीये.

आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेनं जोरदार करवसुली करुन राज्यातली श्रीमंत महापालिका होण्याचा मान मिळवला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार कसा द्यायचा असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला होता. त्यातच 1500 कोटींच्या कामांचा बोजा महापालिकेवर पडला होता. मात्र गेल्या दीड वर्षात शहरातली अनावश्यक कामं बंद करुन काटकसर करत वसुलीवर भर दिल्याने महापालिका 2 हजार कोटींच्या ठेवीवर पोहोचली.

नवी मुंबई महापालिकेच्या सध्याच्या आर्थिक स्थितीवर नजर टाकूयात...

- मागील 7 महिन्यात 1 हजार कोटींच्या ठेवी ठेवल्यात

- महापालिकेला AA रेटिंग क्रेडिट मिळालीय

- MMRDAचं 138 कोटींचा कर्ज अगोदर भरण्यास तयार

- वित्तीय संस्था महापालिकेला 1 हजार कोटींचं कर्ज देण्यास तयार

- मार्च 2018 पर्यंत महापालिकेच्या ठेवी होणार अडीच हजार कोटींच्या

भविष्यात देखभालीवर भर देत गरजेनुसार शहरातील उड्डाणपुले, भुयारी मार्ग, शाळा, पार्किंग आणि पब्लिक ट्रान्स्पोर्टवर भर दिला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 05:37 PM IST

ताज्या बातम्या