व्हॉट्सअॅपवर जर अश्लील मेसेज येऊ लागले, तर सावध व्हा !

व्हॉट्सअॅपवर जर अश्लील मेसेज येऊ लागले, तर सावध व्हा !

नाशिकमध्ये 31 लोकांचं व्हॉट्सअॅप हॅक करून त्यांना अश्लिल मेसेज पाठवणाऱ्या दिप्तेश सालेचाला राज्यस्थानातून अटक करण्यात आली.

  • Share this:

कपिल भास्कर, नाशिक

03 जुलै : अचानक तुम्हाला व्हॉट्सअॅपवर अनोळखी अकाऊंटवरून अश्लील मेसेज येऊ लागले, तर सावध व्हा आणि वेळीच पोलिसांत तक्रार करा..कारण अशा घटना आता समोर येऊ लागल्यात. नाशिकमध्ये 31 लोकांचं व्हॉट्सअॅप हॅक करून त्यांना अश्लिल मेसेज पाठवणाऱ्या दिप्तेश सालेचाला राज्यस्थानातून अटक करण्यात आली.

हाच तो दिप्तेश सालेचा...आता तोंड लपवणारा हा दिप्तेश नाशिकच्या 31 लोकांचे व्हॉट्सअॅप हॅक करून त्यांना सातत्यानं अश्लिल मेसेज पाठवत होता. आपल्या मित्र आणि नातेवाईकांकडुनच अश्लिल मेसेज येऊ लागल्यावर अनेकांनी याविषयीची पोलिसांत तक्रार केली.

28 महिला आणि 2 पुरुषांचं व्हॉट्सअॅप या दिप्तेश सालेचाने हॅक केले. राजस्थानात भावाच्या दुकानाचं वायफाय वापरून तो हे अश्लिल मेसेज पाठवत होता. नाशिक पोलिसांनी  सायबर एक्सपर्टच्या मदतीने अवघ्या काही दिवसात आरोपीला दिप्तेशला अटक केली.

पण आत्तापर्यंत त्यातल्या त्यात सेफ समजलं जाणारं व्हॉट्सअॅपही हॅक होण्याची घटना गंभीर आहे. यानिमित्ताने व्हॉट्सअप हॅक झालं हे कसं ओळखावं, सोशल मिडियावर वावरतांना काय काळजी घ्यायला हवी याविषयी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 3, 2017 11:11 PM IST

ताज्या बातम्या