भटक्या कुत्र्याच्या हल्यात एका वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

भटक्या कुत्र्याच्या हल्यात एका वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

कुत्र्यानं फक्त मुलावरच नाही तर जनाबाईवर देखील हल्ला केला. दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत मुलानं प्राण गमावले होते.

  • Share this:

12 फेब्रुवारी : जिथं भटक्या कुत्र्यांशी सामना करावा लागत नाही, असं एकही शहर राज्यात शोधून सापडणार नाही. मात्र हे भटके कुत्रे आता जीवघेणे ठरताहेत. नाशिकमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय.

हा फोटो जेवढा धुसर आहे, त्यापेक्षा या फोटोतल्या बाळाचं आयुष्य अल्पजीवी ठरलंय. नाशिकच्या देवळालीमध्ये राहणाऱ्या या चिमुकल्या जीवाचे, रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले. आणि कुत्र्यांच्या हल्ल्यात हा एक वर्षाचा मुलगा मृत्यूमुखी पडलाय.

मन सुन्न करणारी, आणि तेवढीच मनात भीती निर्माण करणारी ही घटना देवळालीतल्या वडगाव पिंगळा परिसरात घडलीय.

वीटभट्टीवर काम करणाऱ्या जनाबाईने मुलाला घराबाहेर खेळायला सोडलं आणि लहान सहान कामासाठी त्या घरात शिरल्या.

मात्र, मुलाच्या किंकाळ्या ऐकून जेव्हा ते घराबाहेर पडल्या तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकरली.

कुत्र्यानं फक्त मुलावरच नाही तर जनाबाईवर देखील हल्ला केला.

दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत मुलानं प्राण गमावले होते.

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात नाशिक महापालिका अपयशी ठरल्याचं या घटनेनं पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. एकट्या नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या 65 हजाराच्या घरात आहे.

काही परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत एवढी आहे की रात्री 10नंतर स्थानिक घराबाहेर पडायला धजावत नाहीत.

परिस्थिती एवढी गंभीर असताना देखील नाशिक महापालिका बेसावध राहिली आणि एका निष्पाप जीवाचा बळी गेला.

त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नको, असा सवाल विचारणं चुकीचं ठरणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 12, 2018 10:37 PM IST

ताज्या बातम्या