नाशिकमध्ये रेशनिंग दुकानात अधिकाऱ्याची लाचखोरी कॅमेऱ्यात कैद

नाशिकच्या पुरवठा विभागाचा अधिकारी रेशनिंग दुकानदारांकडून खुलेआम पैसे वसुली करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 2, 2017 08:38 PM IST

नाशिकमध्ये रेशनिंग दुकानात अधिकाऱ्याची लाचखोरी कॅमेऱ्यात कैद

02 डिसेंबर : नाशिकच्या पुरवठा विभागाचा अधिकारी रेशनिंग दुकानदारांकडून खुलेआम पैसे वसुली करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सरकार पारदर्शक कारभार करतंय तो हाच का असा प्रश्न विचारला जातोय.

पारदर्शक कारभाराची ग्वाही देणाऱ्या गिरीश बापटांनी ही क्लिप एकदा पाहावीच... नाशिकच्या पुरवठा विभागात ही अशी वसुली चालतेय. रेशनिंग धारकांचा आधार डाटा फिड करण्यासाठी ठेकेदाराला प्रत्येकी पाच रुपये मिळतायत. तरीही अमन शेख नावाचा पुरवठा अधिकारी रेशनिंग दुकानदारांकडून पैसे वसूल करतोय. न देणाऱ्या रेशनिंग दुकानदारांना डाटा फ्रिज करण्याच्या धमक्या देतोय. दुकानदारांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा प्रकार कैद झालाय.

ही वसुली फक्त अमन शेख यांच्यापुरती मर्यादीत नसून खात्यातील इतर अधिकारीही पैसे घेतात असा संशय नागरिकांना आहे.

जर सरकारी अधिकारी अशी खुलेआम वसुली आणि चिरीमिरी घेत असतील तर पारदर्शक कारभाराची ग्वाही हे सरकार कशाच्या आधारावर फिरवतंय हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2017 08:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...