पैशापायी नातं मेलं, पतीने पत्नीला बहीण सांगून विकलं आणि लग्नही लावून दिलं !

पैशापायी नातं मेलं, पतीने पत्नीला बहीण सांगून विकलं आणि लग्नही लावून दिलं !

तब्बल 3 वर्ष संसार केल्यानंतर, अवघ्या 1 लाख 40 हजारात पतीनं पत्नीची फक्त विक्रीच केली नाही तर ती बहीण आहे असं सांगून तिचा दुसऱ्या व्यक्तीसोबत चक्क लग्नही लावून दिलं.

  • Share this:

प्रशांत बाग, नाशिक

09 आॅक्टोबर : पैश्यांसाठी पतीने चक्क पत्नीचीच विक्री केल्याची धक्कादायक घटना उघड झालीये. तब्बल 3 वर्ष संसार केल्यानंतर, अवघ्या 1 लाख 40 हजारात पतीनं पत्नीची फक्त विक्रीच केली नाही तर ती बहीण आहे असं सांगून तिचा दुसऱ्या व्यक्तीसोबत चक्क लग्नही लावून दिलं. या प्रकरणी पोलिसांच्या मदतीनं सुटका झालेल्या महिलेनं पती आणि सासूसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

इंदिरानगरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.पीडित विवाहिता ही मूळ मनमाडची, लग्नानंतर गेल्या 3 वर्षांपासून या महिलेचा आपल्या पतीसोबत नाशिकला संसार सुरू होता.पण कायमंच पैश्यांसाठी हपापलेल्या पती आणि सासूनं या विवाहितेवर अत्याचार सुरू केले. अखेर तीला गाफील ठेऊन थेट राजस्थानला नेलं आणि जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तीचं थेट दुसरं लग्नंच लावून दिलं.

विशेष म्हणजे विवाहापूर्वी संबंधित वराला वधू ही आपली पत्नी असल्याचे लपवून ठेवत बळजबरीने विवाह लावून दिला.

राजस्थानच्या पाली येथील जैन भवनात या विवाहितेची बहीण आहे असं सांगून पतीनं दाखवण्याचा कार्यक्रम केला. याच ठिकाणी व्यवहार निश्चित झाला आणि लागलीच नोंदणी पद्धतीनं लग्नही लावून देण्यात आलं. अखेर हिम्मत करून,पीडित विवाहितेनं दुसऱ्या पतीला सत्य सांगितलं आणि त्याच दुसऱ्या पतीनं दाखवलेल्या माणुसकीनं विवाहितेला पोलिसांपर्यंत पोचता आलं. माणुसकीच नाही तर पती-पत्नीच्या विश्वासाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील सर्व संशयित सध्या तरी फरार आहे. ते सापडतील, त्यांना शिक्षाही होईल पण मुलींचा जन्मदर घटल्यानं समाजात जे विदारक चित्र तयार झालंय त्याचं काय ?

दरम्यान, सर्व संशयीत फरार झाले आहे.हे प्रकरण फक्त या विवाहितेपुरतं मर्यादीत नसून यात मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

First published: October 9, 2017, 5:39 PM IST

ताज्या बातम्या