नरेंद्र हडियाल मृत्यू प्रकरणी पोलिसांनी 25 लाख उकळल्याचा आरोप

नरेंद्र हडियाल मृत्यू प्रकरणी पोलिसांनी 25 लाख उकळल्याचा आरोप

. नरेंद्र यांना कोठडीत फिनाईल देण्यापासून ते जामीन करण्यासाठी 25 लाख रुपये मागण्यापर्यंत पोलिसांवर आरोप होतोय

  • Share this:

 वैभव सोनवणे, लातूर

23 नोव्हेंबर : लातूरमधल्या पोलीस कोठडीत नरेंद्र हडियाल मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा झालाय. या प्रकरणी पोलिसांनी 25 लाख रुपये उकळल्याचा आरोप होतोय. पोलीस आणि आरोपीच्या भावाचं संभाषण एका आॅडिओ क्लिपमधून उघड झालंय.

लातूरमधल्या पोलीस कोठडीत नरेंद्र हाडियोल या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. त्या प्रकरणात पोलिसांची भूमिका प्रचंड संशयास्पद राहिलीय. नरेंद्र यांना कोठडीत फिनाईल देण्यापासून ते जामीन करण्यासाठी 25 लाख रुपये मागण्यापर्यंत पोलिसांवर आरोप होतोय. केवळ 25 लाख रुपयेच नाही, तर पोलिसांनी साडेतीन कोटी रुपये हडपल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय.

लातूरचे पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड मात्र अजूनही हे प्रकरण गांभीर्याने हाताळताना दिसत नाहीत. त्यांच्या कार्यालयाला आर्थिक व्यवहारांची तक्रार करणारं हिम्मतसिंग हाडियोल यांचं पत्र पोहोचलेलं असतानाही  न्यूज १८ लोकमतशी  बोलताना त्यांनी जाहीरपणे अशी तक्रारच मिळाली नसल्याचं  साफ खोटं सांगितलंय.

नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चिरंजीवी प्रसाद यांनी तातडीने लातूर गाठत याबाबत सखोल चौकशी करणार असल्याचं स्पष्ट केलंय. तर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं सांगितलंय.

या सगळ्या प्रकारचा पाठपुरावा न्यूज १८ लोकमतने केल्यानंतर सरकार ही हडबडून जागं झालंय. कोठडी मृत्यू त्यात कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचे आरोप पोलिसांवर झाल्याने विरोधी पक्ष ही चांगलाच आक्रमक झालाय. काहीही असलं तरी नरेंद्र हाडियोल यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे ही न्यूज १८ लोकमत ची भूमिका आहे.

First published: November 23, 2017, 9:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading