आता राणेंना आमदारकीसाठी पाहावी लागणार जूनपर्यंत वाट !

आता राणेंना आमदारकीसाठी पाहावी लागणार जूनपर्यंत वाट !

जून महिन्यात राज्यपालांद्वारे नामनियुक्त विधानपरिषदेतील 12 जागा रिक्त होणार आहेत

  • Share this:

27 नोव्हेंबर : भाजपतर्फे विधानपरिषदेसाठी प्रसाद लाड यांना उमेदवारीनंतर आता नारायण राणेंना जूनपर्यंत वाट पाहायला लागणार आहे.

विधान परिषद निवडणुकीत भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी न देऊन शिवसेनेसोबत होणार संघर्ष टाळण्याचा प्रसाद लाड यांना उमेदवारी देऊ केली. पण, आता नारायण राणे यांना मंत्रिपदाचे आश्वासन दिल्यामुळे राणेंना काहीकाळ थांबावे लागणार आहे.

जून महिन्यात राज्यपालांद्वारे नामनियुक्त विधानपरिषदेतील 12 जागा रिक्त होणार आहेत. 7 आणि 16 जूनला राज्यपालांच्या कोट्यात राणेंचा नंबर लागू शकतो. जून महिन्यात रिक्त होणाऱ्या आणि सहजतेने निवडून येणाऱ्या भाजपच्या ५ जागा आहेत.

मंत्रिमंडळात घेऊन ६ महिन्यात म्हणजे जूनमध्ये नारायण राणेंना निवडून आणता येऊ शकतंय.

त्यापूर्वी मार्च-एप्रिलमध्येही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातील जागांवर निवडणुका आहेत. पण त्यावेळी राणेंची वर्णी लागण्याची शक्यता नाही.

राणेंना उमेदवारी का नाही ?

- राणे शिवसेनेचे कट्टर विरोधक

- राणेंना उमेदवारी दिली असती तर शिवसेनेचा पाठिंबा मिळाला नसता

- काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केली होती

- राणेंना आधी मंत्री करून मग निवडून आणता येऊ शकतं

- आता मंत्री केलं तर जूनपर्यंत वेळ मिळेल

- जूनमधल्या वि.प. निवडणुकीत भाजपचा विजय सहज शक्य

- शिवसेनेला नाराज न करता राणेंचंही समाधान करता येईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 02:43 PM IST

ताज्या बातम्या