S M L

शिवसेना सोडल्याचा पश्चाताप नाही, पण परत जाणारही नाही -नारायण राणे

"शिवसेनेसह मला सर्वच पक्षांकडून ऑफर होती पण मी गेलो नाही. भाजपकडून ऑफर आहे असं मी कधीही म्हणालो नाही"

Sachin Salve | Updated On: Sep 19, 2017 07:03 PM IST

शिवसेना सोडल्याचा पश्चाताप नाही, पण परत जाणारही नाही -नारायण राणे

19 सप्टेंबर : शिवसेना सोडल्याचा पश्चाताप नाही पण पुन्हा शिवसेनेत जाणार नाही असं स्पष्टीकरण काँग्रेसचे नेते नारायण राणेंनी केलं. तसंच शिवसेनेसह मला सर्वच पक्षांकडून ऑफर होती पण मी गेलो नाही. भाजपकडून ऑफर आहे असं मी कधीही म्हणालो नाही, असंही राणेंनी म्हणाले.

आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत नारायण राणे यांनी आपल्या भाजपप्रवेशाचा जाहीर खुलासा केला. तसंच यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर देत जोरदार टीका केली.

काँग्रेसमध्ये माझ्यावर अन्याय झाला. प्रश्न मी कोणत्या पक्षात जाणार तो नाहीय, काँग्रेसनं शब्द न पाळल्याचा प्रश्न आहे. मला तेव्हा मुख्यमंत्रिपद देतो सांगितलं, दिल्लीलाही नेलं. पण पद दिलं नाही, जर काँग्रेसनी पद दिलं असतं तर सत्ता गेली नसती असा खुलासा राणेंनी केला.अशोक चव्हाण पक्ष संपवायला निघाले आहे. जिथे सत्ता नाही, तिथे जिल्हाध्यक्षही नाही, आणि ज्या जिल्ह्यात सत्ता आहे, तिथे कार्यकर्त्यांना काढून टाकायचे उद्योग चव्हाण करतात, असा आरोपही राणेंनी केला.

सेनेचे मंत्री अज्ञानी

तसंच शिवसेनेकडून भाजपला आव्हान नाही तर सेनाच भाजपमागे जातेय. शिवसेनेचे मंत्री अज्ञानी असून मंत्र्यांना आमदारांची कामं करता येत नाहीत अशी टीकाही नारायण राणेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2017 07:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close