S M L

वेट लाॅसचा प्रयत्न अंगाशी, महिलेच्या मेंदुला इजा !

अनेकदा वजन कमी करण्याच्या नादात तब्येतीवर घातक परिणाम होऊ शकतो. याचाच अनुभव सध्या गौरी अत्रे घेतायेत

Sachin Salve | Updated On: Mar 21, 2018 11:38 PM IST

वेट लाॅसचा प्रयत्न अंगाशी, महिलेच्या मेंदुला इजा !

मुजीब शेख, नांदेड

21 मार्च : वजन कमी करण्यासाठी नको ते उपचार केले तर ते जीवावरही बेतू शकतात. वजन कमी करण्याच्या नावाखाली घेतलेल्या निसर्गोपचारांमुळे नांदेडमधली एक महिला तर मृत्युच्या दाढेतून परत आलीये.

अनेकदा वजन कमी करण्याच्या नादात तब्येतीवर घातक परिणाम होऊ शकतो. याचाच अनुभव सध्या गौरी अत्रे घेतायेत. नांदेडमधल्या 29 वर्षांच्या गौरी अत्रे यांनी वजन कमी करण्यासाठी नांदेड शहरातल्या निसर्ग केंद्रात निसर्गोपचार घेतले. चाळीस दिवस त्यांनी तिथं उपचार घेतले. एकूण 50 दिवस गौरीला फक्त एक काढा प्यायला सांगितलं होतं. या सगळ्यामुळे वजन कमी होणं तर सोडाच पण गौरीच्या अंगातली ताकद गेली, तिला दिसेनासं झालं आणि मेंदूची क्रियाही थांबली,ती कोमात गेली. तिला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं. तिथून हैदराबाद, नांदेड, पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये तिच्यावर उपचार झाले. आतापर्यंत तिच्या उपचारासाठी 15 लाख रुपये खर्च झालेत आता गौरी काहीशी स्थिरावली आहे.

कायम मेरीटमध्ये येणारी गौरी आर्ट ऑफ लिव्हींगची प्रशिक्षक म्हणूनही काम पाहायची. केवळ लठ्ठपणा नको म्हणून वाट्टेल ते करू नका असं गौरीच आता कळकळीनं सांगते.

गौरीवर उपचार करणारे डॉ. सुनील कुलकर्णी यांनी मात्र आपल्या उपचारांमुळे गौरीची अशी स्थिती झाल्याचा आरोप फेटाळलेत. गौरीच्या कुटुंबियांनीच योग्य ती काळजी घेतली नसल्याची शक्यता असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

Loading...
Loading...

वजन कमी करण्यासाठी अनेक सल्ले तर दिले जातातच..पण अनेक उपचार केंद्रांचाही हल्ली सुळसुळाट झालाय. तेव्हा खरोखरच वजन कमी करण्याच्या आमिषाखाली काय उपचार दिले जातायेत आणि ते जीवावर बेतत नाहीत ना याची खात्री करून घ्या...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 21, 2018 11:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close