News18 Lokmat

माणुसकी मेली हो !, रक्तबंबाळ 'ती' मदत मागत होती आणि लोकं फोटो काढत होते

भावानं बहीण आणि तिच्या प्रियकराचा निर्घृण खून केलाय. जखमी अवस्थेत ती रस्त्यावर विव्हळत होती आणि लोकं तिचे व्हिडिओ आणि फोटो काढत होते.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2017 10:52 PM IST

माणुसकी मेली हो !, रक्तबंबाळ 'ती' मदत मागत होती आणि लोकं फोटो काढत होते

25 जुलै : नांदेड जिल्ह्यातल्या भोकरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडलीय. भावानं बहीण आणि तिच्या प्रियकराचा निर्घृण खून केलाय. जखमी अवस्थेत ती रस्त्यावर विव्हळत होती आणि लोकं तिचे व्हिडिओ आणि फोटो काढत होते. एवढंच नाहीतर ती रस्त्याच्या कडायला येऊन बसली तरी लोकांनी तिची मदत केली नाही.

ही दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात पण तुम्ही ती पहायलाच हवीत. कारण ही दृश्यं महाराष्ट्राला आरसा दाखवणारी आहेत. आधूनिकतेच्या परंपरेच्या गप्पा मारणाऱ्यांच्या थोबाडात सनकून लगावणारी आहेत. भावानं जीवघेणे वार केलेले असताना रक्तबंबाळ पुजा  मदतीसाठी याचना करत होती त्यावेळेस बघे तिला मदतीऐवजी शूट करत होते. पूजा जीव वाचवण्यासाठी हात जोडत होती त्यावेळेस बघ्यांचे हात आणि डोळे कदाचित बंद झालेले होतं.

ही धक्कादायक घटना घडली 23 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात. काही महिन्यांपूर्वी पूजा चा भोकर मधील एका तरुणाशी लावून देण्यात आला. पण पूजाचे गोविंद कऱ्हाळे नावाच्या युवकाशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे पूजा गोविंद सोबत पळून गेली. याचा राग पूजाचा भाऊ दिगंबर दासरेच्या मनात होता. दिगंबरने दोघांचा पत्ता काढला. त्यांना बहान्याने भोकरला परत घेऊन येताना निवघा रोड शेजारी नेऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

गोविंद कऱ्हाळेचा जागीच मृत्यू झाला पण पूजा जिवंत होती. पूजा स्वत:च शेतातून जवळच्या रोडवर आली. रस्त्यावर आल्यावर ती खाली पडली. पूजा मदतीची याचना करत असल्याचे या व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. स्वत: पूजा उठून रस्त्याच्या कडेला येऊन बसल्याचे दिसत आहे. पण तिला मदत करण्याएवजी रस्तावरुन येणारे जाणारे मोबाईलमध्ये फोटो आणि शुटिंग करण्यात व्यस्त होते.

हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. पूजा जवळपास तासभरापासून अधिक वेळ जिवंत होती. तीला वेळीच मदत मिळाली असती तर कदाचीत वाचलीही असती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 25, 2017 10:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...