नांदेडमध्ये एमआयएमचा सुपडा साफ,हद्दपार !

नांदेडमध्ये एमआयएमचा सुपडा साफ,हद्दपार !

मतदान आणि मतदार यांना गृहीत धरलं की, त्या पक्षाला त्यांची जागा दाखवायला जनता मागेपुढे पाहात नाही हेच निवडणुकीतून पुन्हा एकदा दिसून आलंय.

  • Share this:

12 आॅक्टोबर : नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीतून राज्यात शिरकाव करणाऱ्या एमआयएमला परत मौका न देत नांदेडकरांनी पार सुपडा साफ केलाय. यावेळी एमआयएमला भोपळाही फोडता आला नाही.

आंध्रची सीमा ओलांडून एमआयएम नांदेडमध्ये दाखल झाला आणि तिथून थेट महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला. पण, आता एमआयएमला जिथून सुरुवात झाली तिथेच घाव घातला गेलाय.

नांदेड महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला. काँग्रेसने एकहाती सत्ता राखत तब्बल 66 जागा जिंकल्यात. तर भाजपला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले.

विशेष म्हणजे नांदेडमध्ये मुस्लिम बहुल भागाची संख्या जास्त असल्यामुळे काँग्रेसला पर्याय म्हणून एमआयएमने नेमकं हेच हेरून आपली पायंमुळं रोवली होती. मागील निवडणुकीत पहिल्याच झटक्यात 11 नगरसेवक निवडून आले होते. जी मुस्लिम व्होट बँक काँग्रेसच्या ताब्यात होती ती आता एमआयएमकडे वर्ग झाली होती. याच बळावर एमआयएमचा वारू चौफेर उधळला.

विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्यमधून एमआयएमच्या इम्तियाज जलिल यांनी विजय मिळवला. एवढंच नाहीतर मुंबईतही एमआयएमचे उमेदवार वारीस पठाण यांनी भायखळ्याची जागा पटकावली.

पण सत्ता हे विष असतं हे उगाच म्हटलं जात नाही. जशी सत्ता मिळवली तशी मनं टिकवण्यात एमआयएम अपयशी ठरली. त्यामुळे मुस्लिम समाजाने पुन्हा एकदा काँग्रेसकडे मोर्चा वळवला.

मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आपले मुस्लीम मतदार पक्षांसोबत ठेवण्यास यश मिळालं. पक्षाला या निवडणुकीत २.५५ टक्के म्हणजे १ लाख २७ हजार ७४० मतं मिळाली होती.

एमआयएमनं ५९ उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. त्यातल्या कित्येक जणांचे डिपाॅझिटही जप्त झाले. सर्वाधिक मुस्लिम उमेदवार हे काँग्रेसचे विजयी झाले.

आता त्याची झलक नांदेडमध्ये ही पाहण्यास मिळाली. मुंबईकरांनी तरी मतं दिली पण नांदेडकरांनी पार सुपडाच साफ केला. एमआयएमचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. 11 जागा जिंकणारा एमआयएम पक्ष नांदेडमधून हद्दपार झालाय.

मतदान आणि मतदार यांना गृहीत धरलं की, त्या पक्षाला त्यांची जागा दाखवायला जनता मागेपुढे पाहात नाही हेच निवडणुकीतून पुन्हा एकदा दिसून आलंय.

First published: October 12, 2017, 4:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading