राज्याची उपराजधानी झाली गुन्हेगारीनगरी, 9 महिन्यात 65 खून

राज्याची उपराजधानी झाली गुन्हेगारीनगरी, 9 महिन्यात 65 खून

नागपूर जसं वाढतंय तशी गुन्हेगारीही वाढलीये. गुन्ह्यांची वाढलेली संख्या नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे.

  • Share this:

प्रवीण मुधोळकर,नागपूर

03 नोव्हेंबर : नागपुरात पुन्हा गुन्हेगारीनं डोकंवर काढलंय. गेल्या तीन दिवसांत नागपुरात तीन हत्या झाल्यात. तर नऊ महिन्यात 65 जणांचे खून झालेत. वाढत्या गुन्हेगारीकरणामुळे नागपूर पुन्हा चर्चेत आलंय.

राज्याची उपराजधानी नागपूर ही गुन्हेगारीची राजधानी होऊ पाहतेय. गेल्या तीन दिवसांत नागपुरात तीन खून झालेत. चंद्रपूरच्या एका महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या नागपूरच्या मोरेश्वर वानखेडेंची हत्या झाली. वर्दळीच्या वर्धा रोडजवळच्या नीरीच्या गेटजवळ त्यांचा मृतदेह सापडला. पोलीस मात्र अंधारात आहेत.

गेल्या तीन दिवसात ही नागपूर शहरातील तिसरी खूनाची घटना असल्यानं चिंतेचं वातावरण आहे. तर दुसरीकडे गेल्या नऊ महिन्यात शहरात ६५ खून झालेत.

नागपूर जसं वाढतंय तशी गुन्हेगारीही वाढलीये. गुन्ह्यांची वाढलेली संख्या नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 3, 2017 08:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading