Elec-widget

60 जणांचा ताफा, 2 हत्तींवरून पाठलाग अन् नरभक्षी वाघिणीची 'घरवापसी'

60 जणांचा ताफा, 2 हत्तींवरून पाठलाग अन् नरभक्षी वाघिणीची 'घरवापसी'

13 दिवसांपासून दहशत निर्माण करणारी नरभक्षी वाघीण आज शुक्रवारी अखेर तिच्या मूळ अधिवासात वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात परतली गेली

  • Share this:

13 आॅक्टोबर : नरखेड आणि काटोल तालुक्यात मागील 13 दिवसांपासून दहशत निर्माण करणारी नरभक्षी वाघीण आज शुक्रवारी अखेर तिच्या मूळ अधिवासात वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात परतली गेली. व्याघ्र प्रकल्पाचा संपूर्ण भाग प्रतिबंधित असल्याने वाघिणीला पकडणे किंवा गोळ्या घालून मारणे शक्य नाही. दुसरीकडे, तिला पकडण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या वन अधिकाऱ्यांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे.

ही नरभक्षी T- 27 क्युब-1 वाघीण वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), आष्टी, अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातून नागपूर जिल्ह्यात नरखेड आणि नंतर काटोल तालुक्यात दाखल झाली. ती गुरुवारी 12 आॅक्टोबर रात्री कोंढाळी वनपरिक्षेत्रतील कावडीमेट भागातून नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील मेट गावाकडे निघाली. ती शुक्रवारी सकाळी नागपूर जिल्ह्याच्या दिशेने वळली होती. त्यामुळे घोटीवाडा गावाकडून हत्ती (जंगबहादूर आणि दामिनी )च्या मदतीने तिचा शोध घेणो सुरू करण्यात आले.

दरम्यान, रेडिओ कॉलरद्वारे तिचे लोकेशन वर्धा जिल्ह्यातील उमरविहिरी ते मेट दरम्यान असल्याचे निदर्शनास येताच जंगबहादूर व दामिनी हे हत्ती उमरविहिरीकडे निघाले. तिला 27 जुलै रोजी नवरगावकडे गली येथे सोडले होते. त्यामुळे ती  येथे परत निदर्शनास येताच वन अधिकाऱ्यांनी तिला पकडण्याची मोहीम थांबविली. ती बोर वाघ्र प्रकल्पात परतल्याने नागपूर जिल्ह्यातील वनअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

सतर्कतेचा इशारा

नरभक्षी वाघीण बोर व्याघ्र प्रकल्पात परतली असली तरी कोंढाळी वनपरिक्षेत्रतील खापा, धोटीवाडा, काकडीमेट, किनकीडोडा आदी गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शिवाय, तिच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे,

Loading...

लोकेशन ट्रेस करणारी स्वतंत्र यंत्रणा

त्या वाघिणीला रेडिओ कॉलर लावण्यात आले आहे. त्या रेडिओ कॉलरच्या संकेतांवरून तिचे लोकेशन ट्रेस करण्यासाठी चार वाहन व चार टीम वापरण्यात आल्या. शिवाय, स्पेशल टागयर फोर्स, वन्यजीव अधिकारी आणि कर्मचारी तसंच स्थानिक वन कर्मचारी आणि पोलीस असा एकूण ५० ते ६० लोकांचा ताफा तिला पकडण्यासाठी लावण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 13, 2017 11:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...