नागपूर जिल्हा न्यायालयात पहिल्यांदाच न्यायदानाचा अधिकार तृतीयपंथीला !

लोक न्यायालयात निवड झाल्यानंतर विद्या यांनी आधी न्यायाधीश आणि वकिलांच्या मार्गदर्शनाखाली खटल्यांचा अभ्यास केला आहे

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2018 11:46 PM IST

नागपूर जिल्हा न्यायालयात पहिल्यांदाच न्यायदानाचा अधिकार तृतीयपंथीला !

10 फेब्रुवारी : तडजोडीने सोडवण्यासारखे न्यायालयातील प्रलंबित खटले समोपचाराने सोडवण्यासाठी देशभरात आज राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. पण नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने एक पाऊल पुढे टाकत घटनेपुढे सर्व नागरिक समान आहेत हा संदेश देण्यासाठी तृतीयपंथी विद्या कांबळे यांची लोकन्यायालयाच्या पॅनलवर निवड केलीये. तृतीयपंथी व्यक्तीने न्यायदान करण्याची राज्यातील बहुदा ह पहिलीच घटना आहे.

समाजात वावरताना सतत अवहेलना आणि उपेक्षा सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांना माणूस म्हणून सन्मान मिळावा यासाठी झटणाऱ्या स्वता तृतीयपंथी असलेल्या विद्या कांबळे या जिल्हा सत्र न्यायालयातील लोकन्यायालयात सुनावणी घेताहेत. या तीन सदस्यांच्या पॅनलमध्ये एक विद्यमान न्यायाधीश, वकील आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या रुपाने विद्या कांबळे यांचा समावेश करण्यात आला.

आजचा दिवस ट्रान्सजेंडर कम्युनिटी साठी ऐतिहासिक आहे. मी त्यांची प्रतिनीधी आहे. प्राधिकरणाने मला संधी दिली मी आभारी आहे. स्त्री, पुरुष आणि तिसरे हे तृतीयपंथी पण आता माझ्यासोबत कुणी भेदभाव करत नाही. वेगळी ओळख मिळाली आहे अशी प्रतिक्रिया  विद्या कांबळे यांनी दिली.

नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयातील मोटार अपघात दावा न्यायाधिकरणात अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोकन्यालयाच्या या पॅनलसमोर ठेवण्यात आले. शाळेत जातांना भरधाव वाहनाने धडक दिल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या विनिता लालवानी या इंजिनिअरींगच्या मुलीच्या पाच वर्षांपुर्वीची अपघात दाव्याची केस पँनलसमोर आली आणि 19 लाखांच्या नुकसानभरपाईसह निकालीही निघाली.

लोक न्यायालयात निवड झाल्यानंतर विद्या यांनी आधी न्यायाधीश आणि वकिलांच्या मार्गदर्शनाखाली खटल्यांचा अभ्यास केला आहे. विद्या कांबळे यांच्या न्यायदानामुळे संपुर्ण तृतीयपंथीयांचा आत्मसन्मान वाढून समाजात सकारात्मक संदेश गेला आहे.

सरकारी कागदपत्रांमध्ये तो किंवा ती असाच उल्लेख होत असला तरी राज्यघटने पुढे सर्व नागरिक समान आहेत हे ध्यानात ठेवून न्यायदानाचे काम तृतीयपंथी विद्या कांबळे यांना सोपवण्यात आले. एकीकडे न्यायदान करून विद्या यांनी तृतीयपंथीयांचा सन्मान वाढवला तर अपघात पिडित मुलीला 19 लाखांची नुकसान भरपाईही मिळवून दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2018 11:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close