समृद्धी हायवेच्या जमीन घोटाळा चौकशीचं काय झालं ?

समृद्धी हायवेच्या जमीन घोटाळा चौकशीचं काय झालं ?

समृद्धी हायवेत अधिकाऱ्यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप सहा महिन्यापूर्वी झाला होता. या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण त्या चौकशीचं झालं काय हे मात्र अजून कळलेलं नाही.

  • Share this:

विवेक कुलकर्णी,मुंबई

12 जून : समृद्धी हायवेत अधिकाऱ्यांनी जमीन घोटाळा केल्याचा आरोप सहा महिन्यापूर्वी झाला होता. या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले होते. पण त्या चौकशीचं झालं काय हे मात्र अजून कळलेलं नाही.

मुख्यमंत्री नेहमीच पारदर्शकतेचा डांगोरा पिटत असतात. पण वस्तूस्थिती मात्र तशी नाहीये. किमान त्यांच्या अधिकाऱ्यांबाबत तरी तेच म्हणावं लागेल. मुंबई-नागपूर समृद्धी हायवेलगत कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी करणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती देण्यात मुख्यमंत्री कार्यालय टाळाटाळ करतंय. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कारवाईचं आश्वासन दिलं होतं. पण सहा महिन्यात ना कारवाई झाली ना चौकशी झाली. मुख्यमंत्री कार्यालयात प्रवीण वाटेगावकर यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केला. त्या अर्जाचा अक्षरक्षः फुटबॉल करण्यात आला.

प्रधान सचिव प्रवीण परदेशी आणि काही निवृत्त अधिकाऱ्यांनी जमीन खरेदी केल्याचा हा आरोप आहे. प्रवीण परदेशी मुख्यमंत्री कार्यालयात असल्यानं या प्रकरणाची चौकशी होत नसल्याचा आरोप वाटेगावकर यांनी केलाय.

सरकारचा कारभार पारदर्शक आहे असं मुख्यमंत्री सांगतात. मग समृद्धी हायवेलगत जमीन खरेदी घोटाळ्याचं काय झालं. त्यांच्यावर कारवाई का झाली नाही याचं उत्तर का मिळत नाही असा सवाल वाटेगावकरांनी उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2017 11:11 PM IST

ताज्या बातम्या