मुंबई विद्यापीठाची डेडलाईन हुकलीच !, आता तरी कुलगुरू राजीनामा देतील का?

मुंबई विद्यापीठाची डेडलाईन हुकलीच !, आता तरी कुलगुरू राजीनामा देतील का?

नागपूर आणि कोल्हापुरातही पेपर तपासणीचा वेग अगदीच मंद आहे. निकालाच्या अपयशाला सर्वस्वी कुलगुरू जबाबदार असल्यानं त्यांनी कुलगुरूपदावर रहावं किंवा राहू नये याची चर्चा सुरू झालीये.

  • Share this:

संदीप राजगोळकर आणि प्रवीण मुधोळकर, नागपूर

31 जुलै : मुंबई विद्यापीठाच्या निकालांची आजची मुदतही पाळण्यात विद्यापीठ आणि कुलगुरू अयशस्वी झालेत. धक्कादायक बाब म्हणजे नागपूर आणि कोल्हापुरातही पेपर तपासणीचा वेग अगदीच मंद आहे. निकालाच्या अपयशाला सर्वस्वी कुलगुरू जबाबदार असल्यानं त्यांनी कुलगुरूपदावर रहावं किंवा राहू नये याची चर्चा सुरू झालीये.

मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा बोऱ्या वाजलाय. 31 जुलैची डेडलाईन पाळण्यासाठी मुंबई विद्यापीठानं कोल्हापूर आणि नागपूर विद्यापीठांची मदत घेतली. पण तेही फारसं उपयोगी पडलेलं नाही. नागपुरात दोन लाख उत्तर पत्रिता पाठवण्यात आल्या. पण त्यातल्या अवघ्या तीन हजारच तपासून झाल्यात.

नागपूर विद्यापीठात पेपर तपासणीत अडचणींचा डोंगर आहे. एक पेपर तपासायला प्राध्यापकांची संख्याही पुरेशी नाही. त्यामुळे पेपर वेळेत तपासून होतील की नाही याची शाश्वती नाही. हे सगळं असूनही विद्यापीठाचा आत्मविश्वास मात्र दांडगा आहे.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात मुंबई विद्यापीठाच्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी तीन केंद्र सुरू करण्यात आलीयेत. पण तिथंलंही काही खरं नाही.

निकाल लागला नसल्यानं हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्हं निर्माण झालंय.  कुलगुरू संजय देशमुखांना मात्र विद्यार्थ्यांच्या भवितव्यापेक्षा स्वतःची खूर्ची प्रिय वाटू लागलीये. कारण ज्या मेरी ट्रॅक्स कंपनीला ऑनलाईन पेपर तपासणीचं कंत्राट दिलं त्या कंपनीची वकिली तुम्हीच केली.  त्यामुळे तुम्हाला कुलगुरूपदावर राहण्याचा अधिकार नाही.

45 दिवसांत विद्यापीठाचे निकाल लावणं गरजेचं असतं. पण ते निकाल लागले नाहीत, खरे तर तेव्हाच तुम्ही कुलगुरूपदावर राहण्याचा अधिकार गमावला होता. लाखो विद्यार्थ्यांसाठी कुलगुरू हे प्रेरणास्थान असतात. तुम्ही तो मान गमावलाय. विद्यापीठाच्या 160 वर्षांच्या इतिहासात तुम्ही अपयशाचा अध्याय लिहिलाय. कुणी राजीनामा मागवा आणि तुम्ही तो द्यावा, त्यापेक्षा तुम्हाला जे पद पेलवलं नाही ते पद सोडून द्यावं हीच अपेक्षा...

First published: July 31, 2017, 8:16 PM IST

ताज्या बातम्या