स्पेशल रिपोर्ट : मुंबई विद्यापीठाची 'परीक्षा', तीनही शाखेत 85 टक्के विद्यार्थी नापास !

स्पेशल रिपोर्ट : मुंबई विद्यापीठाची 'परीक्षा', तीनही शाखेत 85 टक्के विद्यार्थी नापास !

विद्यापीठ मात्र या सगळ्याला कॉलेजना जबाबदार धरतंय. कॉलेजनी पूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला नाही, म्हणून विद्यार्थी नापास झालेत.

  • Share this:

30 मे : मुंबई विद्यापीठाने तीनही शाखातील पहिल्या वर्षाच्या परीक्षा घेतल्या आणि आश्चर्य म्हणजे तीनही शाखातील जवळपास विद्यार्थी नापास झालेत. हा योगायोग आहे की विद्यापीठाच्या कारभाराचे विद्यार्थी बळी ठरलेत?

मुंबई विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची कॉलेज ते विद्यापीठ अशी धावपळ सुरू आहे. कारण तीनही शाखातील म्हणजे आर्टस, कॉमर्स, सायन्समधील अवघे 15 टक्के विद्यार्थी पास झालेत तर 85 टक्के विद्यार्थी चक्क नापास झालेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाची परीक्षा कॉलेजमधून घेतली जायची. विद्यापिठाची पहिल्या वर्षाची परीक्षा घ्यायची ही दुसरी वेळ...

विद्यापीठानं वर्षाच्या मध्येच बदललेला अभ्यासक्रम आणि बदललेला  पेपर पॅटर्न ही मुख्य कारणं समोर आलीत. त्यामुळे विद्यार्थी संघटनानी विद्यापीठालाच या घसरेल्या निकालाला कारणीभूत धरलंय.

विद्यापीठ मात्र या सगळ्याला कॉलेजना जबाबदार धरतंय.  कॉलेजनी पूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला नाही, म्हणून विद्यार्थी नापास झालेत.

First published: May 30, 2017, 10:55 PM IST

ताज्या बातम्या